Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेजर गौरव आर्य यांनी निवडला पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता; ‘हा’ देश गोळी न झाडता मारतोय बाजी

मेजर गौरव आर्य यांनी कोटक प्रायव्हेट बँकिंगच्या कार्यक्रमात चीनच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केले. भारताने संरक्षण खर्च वाढवून उत्पादन क्षमतेवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 04:14 PM
मेजर गौरव आर्य यांनी निवडला पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता (Photo Credit- X)

मेजर गौरव आर्य यांनी निवडला पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मेजर गौरव आर्य यांनी निवडला पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता
  • ‘हा’ देश गोळी न झाडता मारतोय बाजी
मुंबई, एप्रिल २२, २०२६: कोटक प्रायव्हेट बँकिंगच्या ‘टेक अँड काउंटर टेक’ (टीएसीटी) या कार्यक्रमात बोलताना मेजर गौरव आर्य यांनी दावा केला की, पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता चीन आहे. एकही गोळी न झाडता बीजिंग धोरणात्मक फायदा लाटत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. कोटक प्रायव्हेटद्वारे आयोजित या विशेष मंचावर आर्य प्रेक्षकांना संबोधित करताना म्हणाले की, जगाचे लक्ष इस्रायल, इराण आणि अमेरिकेवर असताना चीन अत्यंत शांतपणे आणि पद्धतशीरपणे स्वतःचा फायदा करून घेत आहे. ते म्हणाले, “प्रत्येकजण इस्रायल, इराण आणि अमेरिकेकडे पाहत आहे, पण ज्या देशाला खरोखर फायदा होत आहे तो देश म्हणजे चीन.” ते पुढे म्‍हणाले की, हा संघर्ष एका प्रदीर्घ आणि छुप्या संघर्षाचा भाग असून चीन या अस्थिरतेचा वापर प्रतिस्पर्ध्यांना कमकुवत करण्यासाठी, ऊर्जा मार्गांवर आपली पकड घट्ट करण्यासाठी आणि पाश्चात्य देशांचे लक्ष एकाच वेळी अनेक आघाड्यांवर विचलित करण्यासाठी करत आहे.

कोटक एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात आर्य यांनी इशारा दिला की, चीनचा हा फायदा भारताच्या कमकुवत बाजू उघड करतो. आर्य म्हणाले की, चीनने गेल्या तीन दशकांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली उत्‍पादन क्षमता, लॉजिस्टिक व्याप्ती आणि लष्करी सामर्थ्य वाढवले आहे, तर दुसरीकडे भारताने सद्भावना आणि नैतिक भूमिकेवर जास्त अवलंबून राहणे पसंत केले. “ते शांत राहिले, त्यांनी आपली अर्थव्यवस्था बांधली आणि एके दिवशी जगाला जाग आली तेव्हा लक्षात आले की त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे,” असे आर्य यांनी नमूद केले. भारतासाठी त्यांनी स्पष्ट संदेश दिला: “तुम्हाला प्रचंड मोठ्या स्तरावर उत्‍पादनाची गरज आहे.” औद्योगिक वाढ असल्याशिवाय लष्करी महत्त्वाकांक्षा आणि धोरणात्मक स्वायत्तता हे फक्त शब्दच राहतील, क्षमता नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

टेक अँड काउंटर टेकच्या या दुसऱ्या आवृत्तीत, भू-राजकीय धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भारताची विकासाची घोडदौड कशी टिकून राहील, याचे विश्लेषण करण्यासाठी मेजर आर्य आणि अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा एकत्र आले होते. निलेश शाह यांनी ही चर्चा फक्त हेडलाईन्सपुरती मर्यादित न ठेवता त्याच्या परिणामांकडे वळवली. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या संघर्षाचा भांडवल प्रवाह, पुरवठा यंत्रणा, सुरक्षा आणि राज्य क्षमतेवर काय परिणाम होतो, यावर त्यांनी पॅनेलला मत व्‍यक्त करण्‍यास प्रेरित केले. मिश्रा यांनी आर्थिक बाजू मांडताना सांगितले की, भारत आज पूर्वीच्या संकटांच्या तुलनेत अधिक सज्ज आहे; तर आर्य यांनी अशा सुरक्षाविषयक बाह्य घटकांवर लक्ष केंद्रित केले, ज्याकडे ताळेबंद आणि बाजारपेठ मॉडेल्स सहसा दुर्लक्ष करतात.

‘ऑलवेज ऑन इंडिया’: कनेक्टिव्हिटी आता केवळ सेवा नाही तर जीवनाचा पायाभूत कणा; ‘या’ ७ ट्रेंड्समुळे बदलतोय डिजिटल अनुभव

भारताने अधिक दहशतवादी हल्ल्यांसाठी सज्ज राहिले पाहिजे

आर्य म्हणाले की, हे धोके फक्त पश्चिम आशियापुरते मर्यादित राहणार नाहीत. याचे गंभीर परिणाम होतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “दहशतवादी हल्ले १०० टक्‍के वाढतील,” ते म्हणाले. “लोन वुल्फ अटॅक, स्लीपर सेल्स भारतात, युरोपमध्ये, अमेरिकेत. हे अटळ आहे.” त्यांनी असा युक्तिवाद केला की, आधुनिक युद्धे फक्त सीमेवर संपत नाहीत, तर विचारधारा, नेटवर्क आणि प्रॉक्सीच्या माध्यमातून पसरतात; ज्यामुळे दूरवरचे देश इच्छेनुसार किंवा अनिच्छेने या हिंसेच्या विळख्यात ओढले जातात.

भारतासाठी ही वस्तुस्थिती देशांतर्गत कठोर निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करते. आर्य यांनी वारंवार संरक्षण खर्चाचा मुद्दा मांडला आणि सध्याची पातळी भविष्यातील जोखमींच्या तुलनेत अपुरी असल्याचे सांगितले. “पंतप्रधानांनी मला एक शिफारस विचारली, तर ती हीच असेल,” ते म्हणाले. “संरक्षण खर्च जीडीपीच्या ३.५ टक्‍के असायलाच हवा. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.” नैतिक अधिकार हे लष्करी दहशतीला पर्याय ठरू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. “भीतीशिवाय मैत्री शक्य नाही,” असे सांगत आर्य यांनी स्पष्ट केले की, आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी ताकद दाखवण्याची क्षमताच ठरवते की एखादा देश घटनांना आकार देतो की त्यांच्या दुष्परिणामांचा बळी ठरतो.

त्यांचा इशारा पुन्हा चीनकडे वळला. आर्य यांच्या मते, चीन हा त्रास सहन करण्यास, धैर्याने गुंतवणूक करण्यास आणि मग ती चोक पॉइंट्स, पुरवठा यंत्रणा किंवा प्रॉक्सी संघर्षाच्या माध्यमातून असो, परिस्थितीचा फायदा घेण्यास तयार आहे. याउलट, भारत अजूनही शक्तीकडे प्रणालीगत ऐवजी प्रासंगिक म्हणून पाहतो. “चीन तुम्हाला फक्त सद्भावनेच्या जोरावर जगू देणार नाही,” असे ते म्हणाले. “ते सत्तेचा सन्मान करतात. आणि ती सत्ता उद्योग, संरक्षण उत्पादन व आर्थिक सामर्थ्यातून येते.”

मेजर आर्य म्हणाले की, भारताकडे कृती करण्यासाठी अजूनही संधी आहे, पण त्यासाठी विकास, उत्पादन आणि सुरक्षा यांना एकाच रणनीतीचे भाग म्हणून एकत्र आणणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, पश्चिम आशियातील हा संघर्ष फक्त एक दूरवरचे युद्ध नसून, आगामी दशकात निर्माण होणाऱ्या जागतिक गोंधळाची आणि अस्थिरतेची रंगीत तालीम आहे. “हे जग आता कोणत्याही विशिष्ट संरचनेत राहिलेले नाही,” ते म्हणाले. “तुम्ही सज्ज नसाल, तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल.”

Oil Companies Loss: Diesel विक्रीतून कंपन्यांना होतोय 100 रुपयांचा तोटा; Petrol वर किती सोसावा लागतोय घाटा?

Web Title: Major gaurav arya warns china real winner west asia conflict india defence strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Business News
  • India-China
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
1

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
2

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ
3

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
4

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.