Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या अडीच वर्षात अहंकारामुळे हजारो कोटींचे प्रकल्प रखडले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा ही इच्चशक्ती असते तेव्हाच मोठी कामं आपण करू शकतो. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांमध्ये बंद पडलेले प्रकल्प आम्ही निर्णय घेऊन आणि त्यातील अडथळे दूर करून वेगाने सुरू केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 09, 2023 | 08:57 PM
mchi property expo kalyan In those two and a half years projects worth thousands of crores were stalled due to arrogance chief minister eknath shinde nrvb

mchi property expo kalyan In those two and a half years projects worth thousands of crores were stalled due to arrogance chief minister eknath shinde nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : काही लोक म्हणतात आम्ही दिल्लीला जातो, दिल्लीला जातो. मात्र दिल्लीला (Delhi) जाऊन आम्ही राज्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये आणतो (Brings thousands of crores of rupees for the development of the state). मागील अडीच वर्षांत केवळ अहंकारामुळे (Arrogance) हजारो कोटींचे प्रकल्प रखडले (Projects worth thousands of crores were stalled) आणि सर्वसामान्यांना त्याचा भुर्दंड सोसावा लागला अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray Government) निशाणा साधला.

कल्याणात सुरू असणाऱ्या १२ व्या एमसीएचआय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला (MCHI Property Expo Kalyan) त्यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यावेळी राज्यातील विकास प्रकल्प, त्यांची गती, कल्याण डोंबिवलीचा विकास, इथले भविष्यातील प्रकल्प यांचा उल्लेख करण्यासह नाव न घेता आपल्या विरोधकांचाही समाचार घेतला. यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष भरत छेडा, एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह इतर मान्यवर बांधकाम व्यावसायिकही उपस्थित होते.

[read_also content=”‘यांचे’ खिसे ओले करण्यासाठी टँकर माफीयांचा हैदोस, टँकर मध्येच होतोय लाखो लीटर पाणी उपसा; पाटबंधारे विभागाचे सपशेल दुर्लक्ष! https://www.navarashtra.com/crime/water-theft-in-kalyan-millions-of-liters-of-water-are-pumped-in-the-tanker-itself-complete-neglect-of-the-irrigation-department-nrvb-382476.html”]

राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा ही इच्चशक्ती असते तेव्हाच मोठी कामं आपण करू शकतो. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांमध्ये बंद पडलेले प्रकल्प आम्ही निर्णय घेऊन आणि त्यातील अडथळे दूर करून वेगाने सुरू केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकाच विचाराचे असते तेव्हा राज्यांचा देखील विकास होत असतो. आणि म्हणून या राज्याच्या विकासासाठी आम्ही दिल्लीला जातो. त्यासाठी आमच्या डोक्यात कोणताही अहंकार नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहर वाढत आहेत आणि या वाढत्या शहरांच्या गरजाही वाढत्या आहेत. त्या विचारात घेऊन आज कल्याण डोंबिवली परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासाचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पूर्णत्वास येणारा मोठा गाव माणकोली पुल, रिंग रोड, ऐरोली – काटई एलिव्हेटेड मार्ग, रिंग रोड प्रकल्प, कल्याण पडघा आठ पदरी रस्ता, त्याशेजारून जाणारा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग, खडक पाडामार्गे उल्हासनगर पर्यंत मेट्रो, शिळफाटा ते रांजणोली एलिव्हेटेड रोड, यासारख्या अनेक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. ज्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांमधून मुंबईसह राज्याच्या इतर महत्वाच्या भागासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

[read_also content=”ग्राहकांना लुबाडण्याचे धंदे बंद करा अन्यथा…,ऑनलाइन मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या कॅशिफाय कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मनसे टेलिकॉम सेना आक्रमक https://www.navarashtra.com/maharashtra/the-mns-telecom-sena-is-aggressive-about-the-financial-malpractice-of-the-online-mobile-phone-buying-and-selling-company-cashify-nrvb-382458.html”]

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राउंडचा उल्लेख करत तो साफ करून त्याठिकाणी मोठे गार्डन करा. तिथे बिल्डिंग वगैरे बांधू नका अशा सूचना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना केली. बाहेरून कल्याणात आल्यावर कचऱ्याचा मोठा डोंगर दिसतो तो साफ करून याठिकाणी मोठे गार्डन केल्यास लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. तर एमसीएचआयमधील बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई ठाण्याच्या धर्तीवर केडीएमसी प्रशासनाला सहकार्य करा. शासनाकडून जे काही हवंय ते आम्ही सर्व करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Mchi property expo kalyan in those two and a half years projects worth thousands of crores were stalled due to arrogance chief minister eknath shinde nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2023 | 08:57 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • Thousands

संबंधित बातम्या

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर
1

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
2

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
4

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.