Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Piyush Goyal: उत्तर मुंबईत हॉटेल उद्योग जगताचा होणारा विस्तार पाहता या क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, असेही केंद्रीय मंत्री  गोयल यांनी नमूद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 07:32 PM
सहा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती

सहा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती

Follow Us
Follow Us:
  • कौशल्य विकास केंद्रासाठी सामंजस्य करार संपन्न
  • उत्तर मुंबईत सहा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून रोजगार 
  • केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल 
मुंबई/Piyush Goyal: उद्योग जगतातील मनुष्यबळाची मागणी पाहता उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्रासाठी पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेण्यात येत आहे. उद्योग जगातील बदलत्या तंत्रज्ञानाला कुशल मनुष्यबळाची सांगड घालण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्क्युबेशन सेंटर, अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन या केंद्राचा वापर रोजगार निर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. विविध ठिकाणी कार्यरत मनुष्यबळाला नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

कांदिवली येथील ठाकुर व्हिलेज याठिकाणी कौशल्य विकास केंद्रासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यात सामंजस्य करार आज (दिनांक ५ सप्टेंबर २०२६) करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या कौशल्य विकास केंद्रासाठी समाज कल्याण सुविधा भूखंड उपलब्ध करून दिला आहे.

कौशल्य विकास केंद्रासाठीच्या सामंजस्य करारप्रसंगी मुंबईचे उपमहापौर  संजय घाडी, नगरसेविका निशा परुळेकर, नगरसेवक दीपक(बाळा) तावडे, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा – लवंगारे, एनएसडीसीचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी संजीव सिंह तसेच महिंद्रा समुह आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समुहाचे अधिकारी उपस्थित होते.

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. अशावेळी विविध ठिकाणी कार्यरत मनुष्यबळाने अद्ययावत प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन रोजगाराच्या संधी मिळवायला हव्यात. त्यासाठी सायंकाळच्या वेळी तसेच आठवड्याच्या शेवटी कौशल्य विकास केंद्राच्या ठिकाणी प्रशिक्षणाचे वर्ग उपलब्ध करून देण्यात येतील. तरुणाईला विविध भाषा आत्मसात व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॕक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्गही याठिकाणी चालविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली.

उत्तर मुंबईत हॉटेल उद्योग जगताचा होणारा विस्तार पाहता या क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, असेही केंद्रीय मंत्री  गोयल यांनी नमूद केले. उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, रिअल इस्टेट क्षेत्राने घेतलेली भरारी पाहता त्यादृष्टीने प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे. उद्योग जगताच्या मागणीनुसार अधिक कुशल कामगार वर्ग उपलब्ध करून देण्यात कौशल्य विकास केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उद्योग जगताला हव्या असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा वेळोवेळी केल्यास हे पाऊल आधुनिक भारताच्या दिशेने पुढे जाईल. मुंबईसोबतच ग्रामीण महाराष्ट्रासाठी देखील कौशल्य विकास केंद्रातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपमहापौर घाडी यांनी व्यक्त केला.

नितीन नबीन यांच्या टीममध्ये पियूष गोयल; आता केंद्रीय मंत्रिपदाचा द्यावा लागणार राजीनामा?

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा – लवंगारे म्हणाल्या की, उद्योग जगतासाठी आवश्यक प्रशिक्षण वर्ग उपलब्ध करून देणे यामध्ये कौशल्य विकास केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पायाभूत सुविधांचे निर्माण पाहता अद्ययावत कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यासोबतच उद्योग जगाच्या कुशल मनुष्यबळाची सांगड घालण्यासाठी संयुक्त विद्यमाने प्र‌शिक्षण वर्गासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष क्षेत्रासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होईल. नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात तसेच कुशल मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात कौशल्य विकास केंद्राचा मोलाचा वाटा असेल, असा विश्वास श्रीमती वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला.

Web Title: Minister piyush goyal six skill development centers genrate to employment at north mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Business News
  • Mumbai News
  • New employment
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
1

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
2

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
3

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…
4

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.