नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट; घेतला 'हा' मोठा निर्णय!
नवीन वर्षाच्या पहिल्याच केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रिय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सरकारने डीएपी खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी विशेष पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना डीएपीसाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत, आणि त्यांना खतांवर अधिक अनुदान मिळू शकणार आहे. डीएपी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त सरकार आर्थिक मदत देखील करणार आहे.
Elon Musk : एलॉन मस्क यांनी बदललं स्वत:चं नावं; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार
मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णयही आला असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विमा योजना अधिक आकर्षक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पीक विमा योजना सुलभ करण्यासाठी, त्याच्या नियम आणि नियमांमध्ये सुधारणा केली जाणार. यासह, पिकांचा विमा स्वस्त दरात आणि सुलभ नियमांनुसार मिळेल याची व्यवस्था केली जाणार आहे.
‘या’ मुख्यमंत्र्याच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; वर्षभरात पाडला पैशांचा पाऊस
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
2025 ची पहिली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ज्यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये डीएपीवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीएपी म्हणजे डी-अमोनियम फॉस्फेट, हे एक खत आहे. जे पिके आणि वनस्पतींसाठी फॉस्फरस आणि नायट्रोजनचा मुख्य स्त्रोत आहे. डीएपी हे पाण्यात विरघळणारे खत आहे. जे अमोनिया आणि फॉस्फोरिक ऍसिडच्या अभिक्रियाने बनते. शेती आणि इतर उद्योगांसाठी ही एक लोकप्रिय खत म्हणून निवड आहे. कारण ती जलद विरघळणारी आणि पोषक तत्वांमध्ये जास्त आहे.