Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात

आयटेलने भारतीय बाजारात Zeno 100 Pro स्मार्टफोन आणि Zeno Powerbank लॉन्च केले आहेत. मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन, UltraLink कनेक्टिव्हिटी, 3+5GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह Zeno 100 Pro हा आपल्या सेगमेंटमधील परवडणारा स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2026 | 06:43 PM
Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात

Follow Us
Follow Us:
  • Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर
  • Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात
  • ३+५जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह उपलब्ध
 

मुंबई: झेनोने आज आपला नवीन झेनो १०० प्रो स्मार्टफोन आणि झेनो पॉवरबँक लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, झेनो १०० प्रो हा आपल्या सेगमेंटमधील सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन (एमआयएल-एसटीडी-८१०एच) मिळाले असून, त्यामुळे तो अधिक मजबूत आणि टिकाऊ ठरतो. यामध्ये अल्ट्रालिंक फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे नेटवर्क उपलब्ध नसतानाही कनेक्टिव्हिटी राखण्यास मदत होते.

हा स्मार्टफोन ३+५जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय झेनो मालिकेतील नुकताच लॉन्च झालेला झेनो लाइट देखील २जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेजसह बाजारात उपलब्ध आहे. झेनो १०० प्रो आता अमेझॉन वर ८,५९९ रुपये या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तर १०,००० एमएएच आणि २०,०००एमएएच क्षमतेचे झेनो पॉवरबँक लॉन्च ऑफर अंतर्गत अनुक्रमे १,२९९ रुपये आणि २,०६९ रुपये (अतिरिक्त १०% सवलतीसह) या किमतीत उपलब्ध आहेत. झेनो लाइटची किंमत ७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

Samsung Foldables: भारतीय बाजारात सॅमसंगचा धमाका; नव्या पिढीसाठी Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ची एंट्री

कंपनीच्या मते, झेनो या नावातील प्रत्येक अक्षर उत्तम वापरकर्ता अनुभवाचे प्रतीक आहे. यामध्ये झेड म्हणजे झेनिथ ऑफ डिझाईन म्हणजेच उत्कृष्ट डिझाइन, इ म्हणजे एलिव्हेटेड एक्स्पीरियंस म्हणजेच अधिक समृद्ध अनुभव, एन म्हणजे नुआन्स्ड कंट्रोल म्हणजेच अधिक प्रभावी नियंत्रण आणि ओ म्हणजे ऑप्टिमाइज्ड आउटपुट म्हणजेच सर्वोत्तम कार्यक्षमता दर्शवते.

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तलापात्रा म्हणाले, “झेनो सिरीज ही स्वतःमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी मालिका आहे. स्टायलिश आणि ट्रेंडी उत्पादने ही प्रत्येकाच्या आवाक्यात असावीत, असा आमचा विश्वास आहे. जेन झीच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही डिझाइन, परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यांचा उत्तम संगम सादर केला आहे. वाढत्या उत्पादन खर्चानंतरही आम्ही ही उत्पादने अत्यंत स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध करून दिली आहेत, कारण प्रत्येक ग्राहकाला स्टायलिश आणि भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञानाचा अनुभव मिळायला हवा.”

झेनो १०० प्रो या स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा ९० हर्ट्झ एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, जो अत्यंत स्मूथ आणि आकर्षक व्हिज्युअल अनुभव देतो. यामध्ये असणाऱ्या डीटीएस साऊंड तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट ऑडिओ क्वालिटी मिळते. फोनमधील डायनॅमिक बार या विशेष फीचरद्वारे बॅटरी, कॉल आणि नोटिफिकेशन्स यांसारखी महत्त्वाची माहिती सहज पाहता येते.

फोटोग्राफीसाठी यामध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच आयआर ब्लास्टरच्या मदतीने टीव्ही, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे सहज नियंत्रित करता येतात. हा स्मार्टफोन युनिसॉक टी७१०० ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि अँड्रॉइड १५ गो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, ज्यामुळे मल्टीटास्किंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉलिंगचा उत्तम अनुभव मिळतो. सुरक्षेसाठी यात फेस अनलॉक आणि साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय यात ५००० एमएएचची बॅटरी आणि १० व्हॉटचा चार्जर मिळतो, तसेच हा स्मार्टफोन कॉमेट ऑरेंज, क्लाउड व्हाईट आणि ब्लैक या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

झेनो २०,००० एमएएच पॉवरबँक

झेनोचा २०,००० एमएएच पॉवरबँक ४५ व्हॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे तो स्मार्टफोन आणि टॅबलेटसोबतच काही सुसंगत लॅपटॉप्सही सहज चार्ज करू शकतो. यामध्ये डिजिटल बॅटरी डिस्प्लेसह पीडी ३.०, क्यूसी ३.० आणि ॲपल २.४ए यांसारख्या प्रगत फास्ट चार्जिंग प्रोटोकॉलचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ड्युअल आऊटपुट पोर्ट्स आणि इनबिल्ट टाईप-सी केबलची सोय असल्यामुळे प्रवासादरम्यान चार्जिंग करणे अत्यंत सोपे आणि सोयीस्कर होते.

Aadhaar Card हरवलंय किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर

झेनो १०,००० एमएएच पॉवरबँक

झेनो १०,००० एमएएच पॉवरबँक अतिशय कॉम्पॅक्ट आणि खिशात सहज मावणाऱ्या पॉकेट-फ्रेंडली डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. हा पॉवरबँक २२.५ व्हॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि त्यामध्ये डिजिटल बॅटरी डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय ड्युअल आऊटपुट पोर्ट्स आणि टाईप-सी टू टाईप-सी केबल असल्यामुळे एकाच वेळी दोन उपकरणे सहज चार्ज करता येतात. हलके वजन आणि पोर्टेबिलिटी यामुळे हा पॉवरबँक रोजच्या वापरासाठी एक अत्यंत उत्तम आणि सोयीस्कर पर्याय ठरतो.

Web Title: Itel zeno 100 pro smartphone and zeno powerbank launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • india
  • smartphone

संबंधित बातम्या

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
1

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल
2

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

Preschool India : युरोकिड्सचा मोठा उपक्रम; 18-24 महिन्यांच्या बालकांसाठी ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ कार्यक्रमाची सुरुवात
3

Preschool India : युरोकिड्सचा मोठा उपक्रम; 18-24 महिन्यांच्या बालकांसाठी ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ कार्यक्रमाची सुरुवात

Madhya Pradesh UCC Bill: UCC लागू करणारे मध्य प्रदेश ठरले चौथे राज्य, विधानसभेत विधेयकाला मंजुरी
4

Madhya Pradesh UCC Bill: UCC लागू करणारे मध्य प्रदेश ठरले चौथे राज्य, विधानसभेत विधेयकाला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.