iPhone आणि अँड्रॉइड ही स्मार्टफोनच्या जगातील दोन लोकप्रिय नाव आहेत. टेक कंपनी Apple आयफोन लाँच करते. तर सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, नाथिंग अशा अनेक कंपन्या आहेत जे अँड्रॉइड स्मार्टफोन लाँच करतात. डिझाईनपासून कॅमेऱ्या आणि फिचर्सपर्यंत आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये बराच फरक आहे. हाच फरक आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone की Android? कोण आहे खरंच स्मार्ट? खरेदी करण्यापूर्वी फरक जाणून घ्या

फ्रंट लूक - दोन्ही डिव्हाईसचा फ्रंट लूक पूर्णपणे वेगळा आहे. अँड्राईड स्मार्टफोनच्या फ्रंटला पंच होल आणि कर्वड डिस्प्ले दिला जातो. तर महागड्या आयफोनमध्ये नोच आणि डायनॅमिक डिस्प्ले ऑफर केला जातो.

बॅक पॅनेल - अँड्राईड स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर वेगवेगळे डिझाईनचे कॅमेरे पाहायला मिळतात. तर आयफोनच्या बॅक पॅनलवर क्लीन आणि मिनिमम कॅमेरा लेआउट असतो.

डिझाईन - अँड्राईड स्मार्टफोन्स इनोवेशन आणि वेरिएशन्सने परिपूर्ण असतात. या स्मार्टफोनची डिझाईन आणि त्यांच्या फीचर्समध्ये सतत बदल होत असल्याचे पाहायला मिळते. आयफोनचे डिझाईन प्रीमियम असते आणि यामध्ये एक कन्सिस्टन्सी पाहायला मिळते.

बटन - अँड्राईडमध्ये कस्टम बटन्स असतात. तर आयफोनमध्ये मिनिमल बटन असतात ज्यामुळे फोनला एक क्लीन लूक मिळतो.

डिव्हाईसची किंमत - दोन्ही मॉडेल्सच्या किमतींचा जर विचार केला तर आयफोन अत्यंत प्रीमियम किमतीत उपलब्ध असतात. पण अँड्राईड स्मार्टफोन्स बजेट किमतीपासून मिड रेंज आणि प्रीमियम किमतीपर्यंत उपलब्ध असतात. त्यामुळे युजर्स त्यांच्या गरजेनुसार स्मार्टफोनची खरेदी करू शकतात.






