Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG च्या वाढत्या किमतींना नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक! सादर केली स्वस्तातली नवीन टेक्नॉलॉजी

जागतिक स्तरावर अंदाधुंदी माजली असताना महागाईचा भडका उडाला आहे. त्यात सगळ्यात मोठा प्रश्न इंधन आणि वायूचा उभा राहत आहे. या गोष्टींचा पुरवठा होत नसल्यामुळे याच्या किमती बऱ्याच भडकल्या आहेत. देशात LPG गॅसचं संकट आहे. असं असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी एका नवीन तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 26, 2026 | 04:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Nitin Gadkari Presents Technology : जागतिक स्तरावर अंदाधुंदी माजली असताना महागाईचा भडका उडाला आहे. त्यात सगळ्यात मोठा प्रश्न इंधन आणि वायूचा उभा राहत आहे. या गोष्टींचा पुरवठा होत नसल्यामुळे याच्या किमती बऱ्याच भडकल्या आहेत. सध्या देशात LPG गॅसचं संकट आहे. देशाच्या काही भागात घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडून स्थिती सामान्य असल्याचं सांगितलं जात असलं तरीही मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासला होता.

Tata Motors आणि HPCL मध्ये ऐतिहासिक करार; ऑटोमोटिव्ह कचऱ्यापासून बनवणार उच्च दर्जाचे रिफाइंड ऑईल

त्यात सध्याची परिस्थिती स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बाधित झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. भारतात जवळपास 85 टक्के घरगुती वापराचा गॅस आयात केला जातो. या दरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल-आधारित स्टोव टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी ही नवीन टेक्नोलॉजी सादर केली. नेमकी काय आहे ही टेक्नॉलॉजी जाणून घेऊयात.

स्टोववर जेवण बनवणं सोपं

नितीन गडकरी यांनी ही महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणली आहे. ही टेक्नॉलॉजी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या स्टोववर जेवण बनवणं सोपं होणार आहे. सोबतच हा स्टोवर पर्यावरण अनुकूल आहे असा दावा नितीन गडकरी यांनी केला. हा स्टोव भारताच्या वाढत्या बायोफ्यूल मिशनमध्ये महत्त्वाचा भाग मानला जात आहे. ही स्टोव टेक्नोलॉजी पूर्णपणे स्वदेशी आहे.

स्टो कसा करतो काम?

स्टोवच वैशिष्ट्य म्हणजे हा स्टोवर पूर्णपणे इथेनॉलवर चालत नाही, इथेनॉलमध्ये पाणी मिसळल्यानंतर हा स्टोव काम करतो. या दोघांच्या मिश्रणातून एक स्वच्छ ऊर्जा निर्माण होते. ही टेक्नोलॉजी पारंपारिक LPG सिलेंडर्स आणि केरोसिनच्या तुलनेत सुरक्षित, कमी खर्चिक आणि प्रदूषण मुक्तीचा पर्याय देणारी आहे.

कुकिंग फ्यूल म्हणून वापराचा प्लान

मागच्या दशकभरात भारतात इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामने उत्तम रिझल्ट दिले आहेत. वर्ष 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण अवघं 1.5 टक्के होतं. सरकारी धोरणं आणि बायोफ्यूल क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने वर्ष 2025 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत सरकारचा फोकस वाहनात इथेनॉल वापरावर होता. पण आता कुकिंग फ्यूल म्हणून वापर करण्याचा प्लान बनवला जात आहे.

इथेनॉलमुळे आर्थिक ताण कमी होईल

गडकरी यांच्यानुसार ही टेक्नोलॉजी LPG सिलेंडरच्या तुलनेत खूप स्वस्त पडेल. त्यामुळे सामान्य कुटुंब आणि हॉटेल व्यावसायिकांचा खर्च कमी होईल. केरोसिन, लाकूड आणि कोळशाच्या तुलनेत इथेनॉल पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा आहे. कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन उत्सर्जनाच प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे घराच्या आत शुद्ध हवा राहते.भारत जवळपास 85 टक्के कच्चं तेल आणि एलपीजी आयात करतो. दरवर्षी आयात बिलापोटी लाखो कोटी रुपये देशाबाहेर जातात. इथेनॉलमुळे हा आर्थिक ताण कमी होईल.

Fixed Deposit Rules: मॅच्युरिटीपूर्वी FD बंद करताय? खिशाला बसू शकतो ‘इतक्या’ टक्क्यांचा फटका; ‘हे’ गणित समजून घ्या

Web Title: Nitin gadkari presents cheap alternative technology for expensive lpg gas see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • LPG
  • lpg cylinder
  • LPG Gas
  • LPG Gas Crisis
  • LPG gas cylinder
  • LPG Supply
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
1

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

Bharatmala Project: ५७७ किमीचा महामार्ग, १५ हजार कोटींचा खर्च! नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात
2

Bharatmala Project: ५७७ किमीचा महामार्ग, १५ हजार कोटींचा खर्च! नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात

Nitin Gadkari : E20 पेट्रोलबाबत मोठा खुलासा; इंजिन, मायलेजच्या चर्चांवर नितीन गडकरींचे स्पष्ट उत्तर
3

Nitin Gadkari : E20 पेट्रोलबाबत मोठा खुलासा; इंजिन, मायलेजच्या चर्चांवर नितीन गडकरींचे स्पष्ट उत्तर

Nitin Gadkari: पेट्रोल-डिझेलचा खेळ खल्लास? इथेनॉलनंतर आता ‘या’ गोष्टीपासून बनणार इंधन; नितीन गडकरींचा सर्वात मोठा खुलासा
4

Nitin Gadkari: पेट्रोल-डिझेलचा खेळ खल्लास? इथेनॉलनंतर आता ‘या’ गोष्टीपासून बनणार इंधन; नितीन गडकरींचा सर्वात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.