Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय स्टील उद्योगाला मिळणार मोठं बळ! नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ‘सुफी’सोबत सामंजस्य करार

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज परिसंस्थेचा विकास आणि वृद्धी करण्यासाठी 'स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया' म्हणजेच सुफीसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 27, 2026 | 07:50 PM
(फोटो- सोशल मिडिया)

(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज परिसंस्थेचा विकास आणि वृद्धी करण्यासाठी ‘स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच सुफीसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

चढ-उतारांपासून स्वतःचा बचाव

या भागीदारीचे उद्दिष्ट भारतीय स्टील उद्योगातील घटकांसाठी एक भक्कम, पारदर्शक आणि कार्यक्षम मूल्य-जोखीम व्यवस्थापन प्रणाली  तयार करणे हे आहे, ज्यामुळे त्यांना एक्स्चेंज-ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून किमतींमधील चढ-उतारांपासून स्वतःचा बचाव करता येईल. या उपक्रमाचा फायदा स्टील उत्पादक, प्रक्रिया उद्योग, एमएसएमई (MSMEs), ओईएम (OEMs), पायाभूत सुविधा कंपन्या आणि अंतिम ग्राहक यांसारख्या विविध स्टेकहोल्डर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

या सामंजस्य करारांतर्गत, भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज उत्पादनांचा यशस्वी विकास करण्यासाठी ‘एनएसई’ आणि ‘सुफी’ हे उत्पादन डिझाइन, मार्केट आउटरीच, उद्योग सल्लामसलत, क्षमता बांधणी आणि जनजागृती मोहिमांवर एकत्रितपणे काम करतील.

भारत जगातील स्टीलच्या सर्वात मोठ्या उत्पादक

भारत हा जगातील स्टीलच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि ग्राहकांपैकी एक आहे. ऑटोमोबाईल्स, इंजिनिअरिंग, पायाभूत सुविधा, कॅपिटल गुड्स आणि ग्राहक उपयोगी वस्तू (कंझ्युमर ड्युरेबल्स) यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रस्तावित करारामुळे देशांतर्गत स्टील मूल्य साखळीतील (व्हॅल्यू चेन) घटकांना हेजिंगची एक प्रभावी यंत्रणा उपलब्ध होईल आणि पारदर्शक किंमत निश्चिती प्रक्रियेला (प्राईस डिस्कव्हरी) बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.

NSE चे मुख्य व्यवसाय विकास अधिकार श्री. श्रीराम कृष्णन म्हणाले:

“भारतीय स्टील उद्योग आता लक्षणीयरीत्या परिपक्व झाला असून, पारदर्शक आणि कार्यक्षम जोखीम व्यवस्थापन साधनांची (रिस्क मॅनेजमेंट टूल्स) गरज दिवसेंदिवस वाढते आहे. ‘सुफी’सोबतचे आमचे सहकार्य हे भारतीय स्टील बाजारपेठेतील घटकांच्या हेजिंगविषयक गरजा पूर्ण करणारे विश्वासार्ह आणि लिक्विड डेरिव्हेटिव्ह्ज कंत्राट तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार नाविन्यपूर्ण कमोडिटी डेरिव्हेटिव्ह उत्पादने विकसित करण्यासाठी एनएसई कटिबद्ध आहे.”

हा सामंजस्य करार भारतातील कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठ आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी ‘एनएसई’ आणि ‘सुफी’ यांच्यातील सामायिक वचनबद्धता दर्शवतो.

Web Title: Nse signs mou with sufi for steel and commodity derivatives development see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • BSE Sensex
  • Business News
  • Marathi News
  • NSE
  • sensex
  • Steel Plant

संबंधित बातम्या

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
1

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर
2

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!
3

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज
4

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.