फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीच्या एआय-समर्थित क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म किराणाप्रोने भारताच्या बॅडमिंटन आयकॉन पी. व्ही. सिंधू यांचे गुंतवणूकदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून स्वागत करत मोठी झेप घेतली आहे. किराणाप्रोने प्रख्यात भारतीय बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक प्राप्त केली असून, त्यांनी किराणाप्रोच्या सीड फंडिंग राऊंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक केली आहे. या धोरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून परिसरातील किराणा स्टोअर्सना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआय-संचालित सोल्युशन्ससह सक्षम करून भारतातील रिटेल क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या ब्रँडच्या मिशनला सिंधू यांचा पाठिंबा आहे.
पी. व्ही. सिंधू आणि किराणाप्रो यांच्यातील हा सहयोग कॉर्नरस्टोन स्पोर्टद्वारे सुव्यवस्थित केला जात असून, यामुळे विनासायास सहकार्याची खात्री मिळेल. हा करार ब्रँडच्या दीर्घकालीन वाढीच्या दृष्टिकोनाशी संलग्न असून, डिजिटल तफावत दूर करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. पी. व्ही. सिंधू आता किराणाप्रोच्या अधिकृत चेहरा असतील आणि कंपनीच्या मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावतील. त्या विशेषतः लहान किराणा व्यावसायिकांसाठी ब्रँडच्या उपक्रमांमध्ये योगदान देतील आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा भाग बनतील. आयपीएल २०२५ दरम्यान, सिंधू या ब्रँडच्या अधिकृत अॅम्बेसेडर म्हणून राष्ट्रीय स्तरावर किराणाप्रोची उपस्थिती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील. यामुळे क्विक कॉमर्स क्षेत्रातील कॅटेगरी लीडर म्हणून किराणाप्रोचे स्थान अधिक दृढ होण्यास मदत होईल.
किराणाप्रोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक रविंद्रन म्हणाले, “हा सहयोग किराणाप्रोसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पी. व्ही. सिंधू कौशल्य आणि निर्धाराचे प्रतीक आहेत. आम्ही देशभरात नेटवर्क निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत, जिथे लाखो किराणा स्टोअर्सना स्थानिक ग्राहकांशी जोडले जाईल. सिंधू यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल आणि स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल.”
ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना पी. व्ही. सिंधू म्हणाल्या, “माझा नेहमीच सक्षमीकरणाच्या क्षमतेवर विश्वास आहे. किराणाप्रो परिसरातील किराणा व्यावसायिकांना तंत्रज्ञान स्वीकारण्यास, नवीन संधी शोधण्यास आणि डिजिटल युगात प्रगती करण्यास मदत करत आहे. या प्रयत्नांमुळे केवळ रिटेलच नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवले जात आहे. त्यामुळे भारताच्या विकासातही मोठे योगदान मिळत आहे. ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून या अर्थपूर्ण मिशनचा भाग बनण्याचा मला अभिमान वाटतो.”