Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel New Rule : पेट्रोल पंपांवरील ‘त्या’ नियमामुळे खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण ?

जागतिक परिस्थिती अजून ताणलेली असताना त्याचा परिणाम तेलांच्या किंमतीवर दिसून येत आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. पण रोजच्या जीवनात इंधनाची गरज भासते म्हणून लोकंही त्याची अतिरिक्त खरेदी करत असतात. पण यासगळ्यावर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 13, 2026 | 02:25 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Petrol-Diesel New Rule : जागतिक परिस्थिती अजून ताणलेली असताना त्याचा परिणाम तेलांच्या किंमतीवर दिसून येत आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. पण रोजच्या जीवनात इंधनाची गरज भासते म्हणून लोकंही त्याची अतिरिक्त खरेदी करत असतात. पण यासगळ्यावर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसुलात होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. म्हणजेच नवीन नियमांनुसार घाऊक खरेदीदार यापुढे किरकोळ पेट्रोल पंपावरून तेल खरेदी करू शकणार नाहीत. नेमकी काय आहे ती लिमीट?

EPFO Update: PF खात्यात कधी जमा होणार व्याजाचे पैसे? समोर आली महत्त्वाची अपडेट…

इथेच फक्त परवानगी

आतापर्यंत, मॉल्स, रुग्णालये, मोठे कारखाने, ट्रॅव्हल एजन्सी आणि खाजगी बस ऑपरेटर, जे पूर्वी किरकोळ पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करायचे, आता ते करू शकणार नाहीत. त्यांना फक्त बल्क सेल पॉइंट्सवरून डिझेल खरेदी करण्याची परवानगी असेल.

निश्चित केलेली मर्यादा काय?

याव्यतिरिक्त, एका वाहनासाठी दररोज २०० लिटरची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परिणामी, सामान्य नागरिक आणि लहान व्यावसायिक वाहनांचे चालक पेट्रोल पंपांवरून एकाच व्यवहारात किंवा दिवसभरात मिळून २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करू शकणार नाहीत.

या निर्णयामुळे पेट्रोल पंपांवरील प्रचंड गर्दी कमी होण्यास आणि इंधनाचा अचानक तुटवडा टाळण्यास मदत होईल, तसेच सामान्य वाहनचालकांना इंधन सहज उपलब्ध होत राहील याची खात्री केली जाईल. दरम्यान, गेल्या शुक्रवारी अमेरिका आणि इराण यांच्यात करार झाल्याच्या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ८६ डॉलर्सच्या खाली आले.

ही बंदी का घालण्यात आली?

ही बंदी विशेषतः डिझेलच्या विक्रीला लागू होते. अधिसूचनेत असं स्पष्ट केलंय की, “पेट्रोल पंपांच्या चालकांनी हाय-स्पीड डिझेल केवळ वाहनांच्या टाक्यांमध्ये किंवा PESO द्वारे मान्यताप्राप्त कंटेनर्समध्येच भरावे. एका दिवसात एका ग्राहकाला किंवा वाहनाला २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल दिले जाऊ नये आणि या HSD ची पुनर्विक्री करता येणार नाही.” हा आदेश त्वरित लागू झाला असून तो जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जारी करण्यात आला आहे.

OMCs च्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली सांगितले की, किरकोळ पंप दर आणि मोठ्या प्रमाणावरील बल्क दर यांच्यातील मोठी तफावत पाहता, खऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहन इंधनाचा गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीमध्ये पंपांवर डिझेलचा दर ९५.२० रुपये प्रति लिटर आहे, तर मोठ्या प्रमाणावरील विक्रीचा दर १३४.५० रुपये प्रति लिटर इतका आहे.

मस्कोनॉमी… अनेक देशांच्या GDP लाही टाकलं मागे, 1 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली मस्कची संपत्ती

Web Title: Petrol diesel purchase limit quota system at fuel pumps fact check see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Business News
  • diesel
  • Marathi News
  • new rules
  • petrol diesel

संबंधित बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
1

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
2

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
3

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

‘ग्राहकांसाठी ‘Digital Banking Point 2.0’ अन् व्यापाऱ्यांसाठी ‘AI…; ॲक्सिस बँकेची नवी भरारी
4

‘ग्राहकांसाठी ‘Digital Banking Point 2.0’ अन् व्यापाऱ्यांसाठी ‘AI…; ॲक्सिस बँकेची नवी भरारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.