Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PhonePe ची १० वर्षे : ‘बिल्डिंग फॉर भारत’ या दशकाचा उत्सव! ६० कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा पार

भारतातील डिजिटल व्यवहार क्षेत्रात फोनपेने गेल्या दशकात मोठी क्रांती घडवून आणली आहे. २०२५ मध्ये ६० कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा पार करत कंपनीने डिजिटल अर्थव्यवस्थेत आपले स्थान अधिक मजबूत केले

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 16, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या डिजिटल व्यवहार क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या फोनपेने आपल्या फिनटेक प्रवासाची १० वर्षे पूर्ण केल्याचा महत्त्वाचा टप्पा नुकताच साजरा केला. हा केवळ एका कंपनीचा प्रवास नसून, देशातील कोट्यवधी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आणि व्यवहार सुलभतेचा प्रवास असल्याचे मानले जात आहे. गेल्या दशकभरात फोनपेने भारतात पैसे पाठवण्याची, स्वीकारण्याची आणि व्यवस्थापित करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे.

India Logistics Sector: भारताची लॉजिस्टिक्समध्ये मोठी झेप! लॉजिस्टिक्स सुधारणा कशा बदलत आहेत भारताची जागतिक व्यापारातील भूमिका?

२०२५ मध्ये फोनपेने ६०० दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. यामुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील फोनपेची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. या कालावधीत कंपनीने वापरकर्त्यांचा विश्वास वाढवण्यावर आणि सुरक्षिततेवर विशेष भर दिला. UPI सर्कलसारखी नवी सुविधा सुरू करण्यात आली असून, यामुळे विश्वासार्ह संपर्कांना पेमेंटची जबाबदारी देणे शक्य झाले आहे. तसेच ‘फोनपे प्रोटेक्ट’ या अत्याधुनिक सुरक्षा फ्रेमवर्कमुळे लाखो वापरकर्त्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून संरक्षण मिळत आहे.

व्यापारी वर्गासाठीही फोनपेने मोठी पावले उचलली आहेत. ‘मेड-इन-इंडिया’ स्मार्ट स्पीकर आणि स्मार्ट POD या उपकरणांच्या माध्यमातून लहान-मोठ्या व्यवसायांना डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करण्यात आले आहेत. SIDBI सोबत भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या ‘उद्यम असिस्ट’ उपक्रमामुळे MSME उद्योगांना डिजिटल पद्धतीने औपचारिक क्रेडिट मिळवणे सोपे झाले आहे. या माध्यमातून फोनपे MSME साठी डिजिटल-फर्स्ट एकत्रीकरण देणारी देशातील पहिली संस्था ठरली आहे.

ग्राहकांसाठीही फोनपेने आपल्या सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. भारतातील ‘मिसिंग मिडल’ घटकासाठी परवडणारे होम इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय म्युच्युअल फंडांवर कर्ज, सिक्युअर्ड लेंडिंग यांसारख्या नाविन्यपूर्ण कर्ज सुविधांमुळे गरजूंना तत्काळ आर्थिक मदत मिळू लागली आहे.

या प्रवासाबाबत बोलताना फोनपेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम म्हणाले की, “१० वर्षांत मोठी प्रगती केली असली तरी आमचा प्रवास अजून शिखरावर पोहोचलेला नाही. हे शिखर किती उंच आहे, याची कल्पनाही आम्हाला नाही आणि हेच आम्हाला अधिक प्रेरणा देते.” तर संस्थापक व CTO राहुल चारी यांनी, “लोकांचा विश्वास संपादन करणारी उत्पादने निर्माण करणे हाच आमचा खरा धडा आहे. जिद्द आणि विश्वास यामुळेच एखादी कल्पना प्रभावी ठरते,” असे सांगितले.

Mehul Choksi Money Laundering Case: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवा वळण, ईडीने रोहन चोक्सीवर केले गंभीर आरोप

स्थापनेपासूनच फोनपेने ‘इंडस्ट्री-फर्स्ट’ उपक्रमांद्वारे भारतीय फिनटेक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. डिजिटल गोल्ड, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, स्टॉक ब्रोकिंगपासून ते UPI Lite, क्रॉस-बॉर्डर UPI, इंडस ॲपस्टोअर, शेअर.मार्केट प्लॅटफॉर्मपर्यंत फोनपेने सेवा विस्तार केला आहे. २०२२ मध्ये मुख्यालय भारतात स्थलांतरित केल्यानंतर फोनपे भारताच्या आर्थिक रचनेचा अविभाज्य भाग बनले असून, प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक आर्थिक सेवा देण्याचा संकल्प कंपनीने अधिक बळकट केला आहे.

Web Title: Phonepes 10 years celebrating a decade of building for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • digital
  • Digital news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.