Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Rates : वाहनचालकांना महागाईचा झटका; पुणे-नाशिकमध्ये सीएनजीच्या नव्या दरांची अंमलबजावणी, काय आहेत नवे दर?

CNG Price Hike Pune : पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात आज सकाळपासून प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर पुण्यात सीएनजीचा नवीन दर प्रतिकिलो 94.85 रुपये झाला असून वाहनचालकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2026 | 11:28 AM
वाहनचालकांना महागाईचा झटका; पुणे-नाशिकमध्ये सीएनजीच्या नव्या दरांची अंमलबजावणी, काय आहेत नवे दर?

वाहनचालकांना महागाईचा झटका; पुणे-नाशिकमध्ये सीएनजीच्या नव्या दरांची अंमलबजावणी, काय आहेत नवे दर?

Follow Us
Follow Us:
  • वाहनचालकांना महागाईचा झटका
  • पुणे-नाशिकमध्ये सीएनजीच्या नव्या दरांची अंमलबजावणी
  • काय आहेत नवे दर?
CNG Price Increase Maharashtra: पुणे आणि नाशिकमधील वाहनचालकांना महागाईचा आणखी एक झटका बसला असून सीएनजी (CNG) गॅसच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज सकाळपासून लागू झाली असून, सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे.

दरवाढीनंतर पुण्यात प्रतिकिलो सीएनजीचा दर 94.85 रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्येही नव्या दरांनुसार सीएनजी महाग झाली असून वाहनचालकांना आता इंधनासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. सीएनजीच्या वाढत्या दरांचा परिणाम रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनांवर अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढत असताना वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. इंधन खर्च वाढल्यास त्याचा परिणाम प्रवासी भाडे आणि मालवाहतूक खर्चावरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Gold Price: या वर्षी 2 लाखांचा आकडा पारही नाही करू शकणार सोने, दिग्गज बँकांच्या अहवालात धक्कादायक खुलासा, कसा असेल भाव

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती, पुरवठा साखळीतील बदल आणि वितरण खर्च यांसारख्या कारणांमुळे सीएनजी दरांमध्ये बदल होत असल्याचे सांगितले जात आहे. नव्या दरांमुळे पुणे आणि नाशिकमधील नागरिकांच्या मासिक खर्चावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आली. त्यानुसार, पेट्रोलच्या दरात ₹२.६१ आणि डिझेलच्या दरात ₹२.१७ ने वाढ झाली.

यापूर्वी, १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदा वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवस इंधनाच्या दरात वाढ सुरूच होती. गेल्या दहा दिवसांत पेट्रोलच्या दरात एकूण ₹७.३८, तर डिझेलच्या दरात ₹७.०९ ने वाढ झाली आहे.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. बुलढाणा, वाशिम आणि परभणी जिल्ह्यांमध्ये डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपावर लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.

India US Trade: भारत-अमेरिका व्यापार कराराला गती! १ जून रोजी अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ दिल्लीत

Web Title: Pune nashik cng price hike rs 2 50 new rates news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Nashik
  • Pune

संबंधित बातम्या

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
1

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
2

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!
3

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
4

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.