Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foreign Banks : विदेशी बँकांचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कपातीत आघाडीवर; RBI बुलेटिनमध्ये खुलासा

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी दर कपातीचा सर्वात मोठा फायदा विदेशी बँकांनी आपल्या ग्राहकांना दिला आहे. RBI च्या ताज्या मासिक बुलेटिनमधून उघड झाले आहे. फेब्रुवारी २०२५ ते मे २०२६ दरम्यान Repo दरात झालेल्या कपातीनंतर, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत विदेशी बँकांनी कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरात सर्वाधिक कपात केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 04:12 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • व्याजदर कपातीत आघाडीवर
  • कर्ज अन् ठेवींवर दिला सर्वाधिक दिलासा
  • RBI बुलेटिनमध्ये मोठा खुलासा
भारतीय रिझव्ह बँकेच्या पॉलिसी दर कपातीचा सर्वाधिक फायदा विदेशी बँकांनी ग्राहकांना दिला आहे. सध्याच्या व्याजदर कपातीच्या चक्रादरम्यान, विदेशी बँकांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांपेक्षा कर्ज आणि ठेवी दोन्हीवरील व्याजदरात कपात केली आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आरबीआयच्या मासिक बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. बुलेटिननुसार, फेब्रुवारी २०२५ ते मे २०२६ दरम्यान चलनविषयक धोरण सुलभ करताना, अनुसूचित व्यावसायिक बँकांनी रेपो दराशी जोडलेले बाह्य बेंचमार्क आधारित व्याज दर (ईबीएलआर) आणि निधी आधारित व्याज दर (एमसीएलआर) कमी केले. नवीन कर्ज दरातील या कपातीचा सर्वात मोठा फायदा पायाभूत सुविधा आणि इतर बाह्य बेंचमार्क आधारित व्याजदरांशी संबंधित क्षेत्रांमध्ये दिसून आला. आकडेवारीनुसार, विदेशी बँकांनी रुपयात

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

RBI कडून ६.१० अब्ज डॉलरची निव्वळ विक्री

भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात स्पॉट करन्सी मार्केटमध्ये ६.१० अब्ज डॉलरची निव्वळ विक्री केली. रुपयावरील दबावादरम्यान, हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा आरबीआयने स्पॉट मार्केटमध्ये डॉलरची निव्वळ विक्री केल्याचे बुधवारी जारी करण्यात आलेल्या केंद्रीय बँकेच्या मासिक बुलेटिनमध्ये हे सांगण्यात आले आहे. आरबीआयने मार्चमध्ये ९.७६ अब्ज आणि एप्रिलमध्ये ८.९४ अब्ज डॉलरची निव्वळ विक्री केली होती. बुलेटिननुसार, मे महिन्यात मध्यवर्ती बँकेने स्थूल आधारावर २२.२३ अब्ज खरेदी केले, तर २८.३३ अब्ज डॉलर विकले.

RBI चं काय स्पष्टीकरण

आरबीआयने सांगितले की, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती नरमल्याने आणि सरकार आणि मध्यवर्ती बँकेच्या उपाययोजनांमुळे विदेशी भांडवलाच्या प्रवाहात सुधारणा झाल्यामुळे जूनमध्ये रुपया मजबूत झाला. दरम्यान, बुधवारी आंतरबँक परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३४ पैशांनी घसरून ९६.५९ झाला. बाजार तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, वाढता तणाव, जागतिक बाजारातील जोखीम टाळणे आणि देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरी यामुळे रुपयावर दबाव वाढला.

व्याज कमी करण्यात विदेशी बँका आघाडीवर

घेतलेल्या नवीन कर्जावरील भारित सरासरी व्याजदरात १.२४ टक्क्यांनी कपात केली आहे. त्या तुलनेत खाजगी बँका १.०८ टक्क्यांनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ०.६६ टक्क्यांनी घटल्या. रुपयात घेतलेल्या थकीत कर्जावरील व्याज कमी करण्यात विदेशी बँका आघाडीवर होत्या. त्यांनी व्याजदर १.२० टक्क्यांनी कमी केले, तर खासगी बँकांनी ०.९८ टक्के आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ०.८१ टक्क्यांनी कपात केली. ठेवींच्या दराच्या बाबतीतही विदेशी बँकांनी कमाल कपात केली. परदेशी बँकांनी नवीन देशांतर्गत मुदत ठेवींवरील भारित सरासरी व्याजदर ०.९१ टक्क्यांनी कमी केला, तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अनुक्रमे ०.७४ टक्के आणि ०.७३ टक्क्यांनी कपात केली.

त्याचप्रमाणे, विदेशी बँकांनी सध्याच्या ठेवींवरील व्याजदर ०.९० टक्क्यांनी कमी केले आहेत. हे खाजगी बँकांनी केलेल्या ०.४६ टक्के आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केलेल्या ०.५३ टक्के कपातीपेक्षा खूप जास्त आहे. आरबीआयने गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून रेपो दरात एकूण १.२५ टक्के घट केली आहे. गेल्या वर्षी, मध्यवर्ती बँकेने फेब्रुवारी, एप्रिल आणि डिसेंबरच्या बैठकीत चलनविषयक धोरणात ०.२५ टक्के आणि जूनच्या बैठकीत ०.५० टक्क्यांनी घट केली होती.

IPO: शिक्षण क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा IPO येतोय! फ्यूजन क्लासरूम एड्युटेकमध्ये 31 जुलैपासून गुंतवणुकीची संधी

Web Title: Rbi bulletin foreign banks lead in interest rate cuts rbi sells dollars see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • foreign exchange
  • Interest rate
  • Marathi News
  • RBI
  • RBI governor
  • RBI jobs
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
2

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
3

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.