Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI चा मोठा निर्णय! 57 वर्षे जुन्या प्रणालीत केला बदल, लहान उद्योजक आणि शेतकऱ्यांना होणार फायदा

भारतीय रिझर्व्ह बँकेने ५७ वर्षे जुन्या प्रणालीत बदल करून लहान उद्योजक आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मोठ्या बँकिंग आणि आर्थिक घडामोडींचा फायद लहान उद्योजक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसह इतर घटकांना होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 23, 2026 | 11:58 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

RBI New Guidelines 2026 : भारतीय रिझर्व्ह बँक हा भारताच्या आर्थिक सिस्टीमचा घाभा आहे. भारतीय आर्थिकप्रणाली सुव्यवस्थित सुरु राहावी यासाठी त्यात वेळोवेळी आवश्यक ते बदल करणे गरजेचे असतात. आता देखील भारतीय रिझर्व्ह बँकेने ५७ वर्षे जुन्या ‘लीड बँक योजने’त बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जूनपासून एक मोठा बदल केला आहे. त्यासंदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्त्वेदेखील जारी करण्यात आली आहेत. RBI च्या मते, बदलती अर्थव्यवस्था, डिजिटल बँकिंग आणि ग्रामीण गरजा पूर्ण करण्यासाठी आता बदल करणे आवश्यक आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे लहान व्यवसाय, शेतकरी, महिला उद्योजक आणि ग्रामीण भागातील लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. नेमका काय बदल करण्यात आला आहे?

सर्वसामान्यांना लुटून कंपन्या काढताहेत तगडं मार्जिन? Petrol-Diesel च्या किमतींचा रिपोर्ट समोर; अहवालातून मोठा खुलासा

लीड बँक योजना काय आहे?

लीड बँक योजना १९६९ मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील प्रत्येक जिल्ह्यात एका बँकेला बँकिंग सेवांचा विस्तार करण्याची आणि कर्ज व इतर आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपवणे, हा या योजनेचा उद्देश आहे. आता, RBI ने सध्याच्या काळाला अनुरूप होण्यासाठी ही जुनी प्रणाली अद्ययावत केली आहे आणि त्यानुसार नव्या गाईडलाईनदेखील दिल्या आहेत.

नवीन मार्गदर्शक तत्त्व?

१. नवीन प्रणालीनुसार बँकांना लहान व्यवसाय आणि MSME क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. यामुळे लहान व्यवसायांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ होऊ शकते. RBI ची इच्छा आहे की गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्यांना वित्तपुरवठा सहज उपलब्ध व्हावा, जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्याचा स्कोप वाढेल.

२. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाठिंब्याचाही समावेश करण्यात आला आहे. बँकांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता यावे, कृषी कर्जे वाढवणे आणि ग्रामीण भागातील बँकिंग सेवा मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा फायदा लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे.

३. RBI ने बँकांना डिजिटल सेवांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. डिजिटल बँकिंग, ऑनलाइन पेमेंट आणि गावांमध्ये व दुर्गम भागांमध्ये आर्थिक जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाईल. बँकेच्या शाखांवरील अवलंबित्व कमी करणे आणि लोकांना डिजिटल सेवांशी जोडणे हा यामागील उद्देश आहे.

४. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जिल्हा स्तरावर बँकिंग योजनांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यामुळे सर्वाधिक आर्थिक गरजा असलेले क्षेत्र ओळखणे सोपे होईल.

५. RBI ची इच्छा आहे की बँकांनी महिला उद्योजिका, स्टार्टअप्स आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना अधिक पाठिंबा द्यावा. यामुळे लघु रोजगार आणि स्वयंरोजगार वाढण्यास मदत होऊ शकते.

सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होईल?

नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये बँकिंग सेवांमध्ये सुधारणा होईल. लोकांना कर्ज मिळवणे आणि डिजिटल पेमेंट करणे अधिक सोपे जाईल. लहान व्यवसाय, शेतकरी आणि ग्रामीण रहिवाशांना याचा विशेषतः सर्वाधिक फायदा होईल.

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

Web Title: Rbi changes 57 years old system benefits farmers small businesses see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Marathi News
  • MSME
  • RBI
  • RBI Action
  • RBI news

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.