Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Industries : जुने विक्रम मोडत देशाच्या कॉर्पोरेट जगतात रिलायन्सचा दबदबा! ‘या’साठी ठरली देशातील पहिली कंपनी

मुकेश अंबानी यांच्या कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, रिलायन्सने १९५६१० कोटींचा नफा कमावला हा टप्पा ओलांडणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 25, 2026 | 08:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक ऐतिहासिक टप्पा
  • १० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी पहिली कंपनी
  • युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिघडली
Reliance Industries Become first Indian Firm : मुकेश अंबानी यांच्या कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, रिलायन्सने १९५६१० कोटींचा नफा कमावला असून वार्षिक नफ्यात १० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी आहे. या बाबतीत रिलायन्सची बरोबरी कोणीही करू शकत नाही. रिलायन्सचे बाजार भांडवल ₹१८ लाख कोटी आहे.

Noida International Airport: कोण आहेत Nitu Samra ? नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टची धुरा आता प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या हाती?

स्पर्धेत सर्वात जवळ कोण?

रिलायन्सचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी, एचडीएफसी बँक आणि एसबीआय, यांना तो टप्पा गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. बाजार भांडवलानुसार दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ८.०७ अब्ज डॉलर्सचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला, जो मागील आर्थिक वर्षातील ७.५१ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ७.४% ची वार्षिक वाढ आहे. एसबीआयने अद्याप जानेवारी-मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केलेले नसले तरी, तिचा नऊ महिन्यांचा नफा ६३,६५६ कोटी रुपये होता.

तिमाही निकालांची घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत नफ्यात १२.५ टक्के घट होऊन तो १६,९७१ कोटी रुपयांवर आल्याचे जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) कंपनीचा नफा १९,४०७ कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ च्या तिमाहीत नोंदवलेल्या १८,६४५ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षाही हा नफा कमी होता.

युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिघडली

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्सच्या महसुलात महत्त्वपूर्ण योगदान देणारा तेल-ते-रसायन (O2C) व्यवसाय पश्चिम आशियाई युद्धामुळे प्रभावित झाला. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली, ज्यामुळे मालवाहतूक, विमा आणि इंधनाचा खर्च वाढला. सरकारने इंधन निर्यातीवर पुन्हा कर लादल्याने नफ्यावर आणखी दबाव आला. याव्यतिरिक्त, देशांतर्गत ऊर्जेची गरज भागवण्यासाठी, कंपनीला पेट्रोकेमिकल उत्पादनातून स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) उत्पादनाकडे कच्चा माल वळवावा लागला.

नफ्यावर परिणाम होण्याचे एक प्रमुख कारण

रिलायन्सच्या नफ्यावर परिणाम होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील नफ्याच्या प्रमाणावर मर्यादा घातल्या. वास्तविक पाहता, किरकोळ इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील नफ्याच्या प्रमाणावर मर्यादा घातली होती. आपली स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती असूनही रिलायन्सने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीत, ज्यामुळे नफ्यावर आणखी दबाव आला. तेल-ते-रसायने व्यवसायातील मंदीने दूरसंचार आणि किरकोळ क्षेत्रातील दुहेरी अंकी महसूल वाढीचा परिणाम कमी केला. ग्राहक संख्या आणि प्रति वापरकर्ता महसुलात वाढ झाल्यामुळे दूरसंचार व्यवसायातील नफा वाढला, तर हायपर-लोकल रिटेल विभागात ऑर्डर बुकिंग मजबूत राहिले.

PF धारकांसाठी Good News! UPI द्वारे काही मिनिटांत काढता येणार पैसे; EPFO ने जारी केले नवीन नियम

Web Title: Reliance industries becomes first indian firm to cross 10 billion dollar annual profit share in focus details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Business News
  • HDFC Bank Share
  • Marathi News
  • Reliance
  • reliance group
  • Reliance Industries
  • Reliance Infrastructure

संबंधित बातम्या

Cityscape India चे भारतात पदार्पण; मुंबईत रंगणार रिअल इस्टेटचा ग्लोबल इव्हेंट, ४० हून अधिक डेव्हलपर्स येणार एकत्र
1

Cityscape India चे भारतात पदार्पण; मुंबईत रंगणार रिअल इस्टेटचा ग्लोबल इव्हेंट, ४० हून अधिक डेव्हलपर्स येणार एकत्र

Vandana Gupte: ‘….आणि त्यात काहीच चुकीचं नाही’ ‘आमने सामने’ नाटकावरून मोठा वाद, वंदना गुप्ते यांनी मांडली रोखठोक भूमिका
2

Vandana Gupte: ‘….आणि त्यात काहीच चुकीचं नाही’ ‘आमने सामने’ नाटकावरून मोठा वाद, वंदना गुप्ते यांनी मांडली रोखठोक भूमिका

Ramayanam Song judi jodi : श्रीराम-सीतेच्या पवित्र प्रेमाचा सुरेल आविष्कार! करवा चौथनिमित्त ‘रामायणम्’चे ‘जुडी जोडी गाणं प्रदर्शित
3

Ramayanam Song judi jodi : श्रीराम-सीतेच्या पवित्र प्रेमाचा सुरेल आविष्कार! करवा चौथनिमित्त ‘रामायणम्’चे ‘जुडी जोडी गाणं प्रदर्शित

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर
4

Bhaubeej Gift Ideas: भाऊबीजेला बहिणीला द्या बचतीचं गिफ्ट! गॅसचा खर्च कमी करणारे ‘हे’ ५ स्मार्ट गॅझेट्स ठरतील फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.