Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rooftop Solar EMI Scheme : वाढत्या वीज बिलांपासून सुटका! रूफटॉप सोलरसाठी सोपे EMI पर्याय; 3 वर्षांत होणार संपूर्ण खर्च वसूल

Rooftop Solar EMI Scheme : भारतातील वाढती वीज बिले आणि हवामानातील बदलांमुळे होणारा विजेचा अतिवापर या पार्श्वभूमीवर, रूफटॉप सोलर यंत्रणा भारतीय घरमालकांसाठी एक शाश्वत आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. सुरुवातीला लागणाऱ्या मोठ्या इन्स्टॉलेशन खर्चाच्या समस्येवर आता सुलभ 'फायनान्सिंग' आणि 'ईएमआय'च्या पर्यायांमुळे मात करणे शक्य झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 06:07 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वीज बिलांपासून सुटका!
  • रूफटॉप सोलरसाठी सोपे EMI पर्याय
  • 3 वर्षांत होणार संपूर्ण खर्च वसूल
Rooftop Solar EMI Scheme : भारतातील वाढती वीज बिले आणि हवामानातील बदलांमुळे होणारा विजेचा अतिवापर या पार्श्वभूमीवर, रूफटॉप सोलर यंत्रणा भारतीय घरमालकांसाठी एक शाश्वत आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. सुरुवातीला लागणाऱ्या मोठ्या इन्स्टॉलेशन खर्चाच्या समस्येवर आता सुलभ ‘फायनान्सिंग’ आणि ‘ईएमआय’च्या पर्यायांमुळे मात करणे शक्य झाले असून, यामुळे देशात सोलरचा वापर वेगाने वाढत आहे, असे प्रतिपादन इकोफायचे रेसिडेन्शियल रूफटॉप सोलर व्यवसाय प्रमुख स्वप्निल वाकडे यांनी केले. ( Rooftop Solar EMI Scheme ) 

Swiggy IRCTC Food Order : अरे वा! खरंच? आता ट्रेन नंबर टाकताच मिळणार आवडीचं जेवण; Swiggy ने आणलं नवं फीचर

राज्यांत विजेचे दर दरवर्षी ५ ते ८ % वाढ

भारताचा दरडोई वीज वापर दरवर्षी ५ टक्‍क्यांनी वाढत आहे, तर अनेक राज्यांमध्ये विजेचे दर दरवर्षी ५ ते ८ टक्‍क्‍यांनी वाढत आहेत. वाढत्या वापरामुळे कुटुंबे उच्च टॅरिफ स्लॅबमध्ये जातात, ज्यामुळे महिन्याचे बजेट नियंत्रित ठेवणे कठीण होते. या समस्येवर योग्य क्षमतेची रूफटॉप सोलर यंत्रणा हा दीर्घकालीन आणि सुरक्षित उपाय आहे.

रूफटॉप सोलर यंत्रणा अत्यंत लाभदायक

रूफटॉप सोलर यंत्रणा ही घरमालकांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरणारी दीर्घकालीन गुंतवणूक आहे. सध्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि सुलभ फायनान्सिंगमुळे सोलर सिस्टीमचा पेबॅक कालावधी (लागलेला खर्च वसूल होण्याचा वेळ) आता अवघ्या ३ वर्षांवर आला आहे. सोलर मॉड्यूल्सची २५ वर्षांपर्यंतची वॉरंटी आणि इन्व्हर्टरची १० वर्षांची सुरक्षितता लाभत असल्याने, एकदा सुरुवातीचा खर्च वसूल झाला की पुढील उर्वरित कार्यकाळात विजेच्या खर्चात तब्बल ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होते. याशिवाय, इकोफाय सारख्या ग्रीन फायनान्शियर्सकडून उपलब्ध होणाऱ्या ५ वर्षांच्या ईएमआय पर्यायांमुळे मासिक हप्ता हा आधीच्या नेहमीच्या वीज बिलाइतकाच किंवा त्याहून कमी राहतो. परिणामी, दरमहा बिलावर होणाऱ्या निरर्थक खर्चाचे रूपांतर स्वतःच्या मालकीच्या एका कायमस्वरूपी उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेत होते.

‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’तून अनुदान

स्वप्निल वाकडे यांनी पुढे नमूद केले की, “पूर्वी २ ते २.५ लाख रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक हे रूफटॉप सोलर स्वीकारण्यातील मोठे आव्हान होते. केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’ने अनुदान देऊन हा खर्च कमी केला आहे. मात्र, सुलभ फायनान्सिंगमुळे आता पगारदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबेही सहजपणे सोलर बसवू शकत आहेत. निश्चित ईएमआयमुळे कुटुंबांना महिन्याच्या खर्चाचा अचूक अंदाज लावणे सोपे जाते.”

भविष्यात वाढीसाठी अफाट संधी

सध्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’द्वारे सुमारे ४५ लाख घरांवर सोलर बसवण्यात आले आहे. ही प्रगती लक्षणीय असली, तरी भारतातील एकूण कुटुंबांच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही ५ टक्‍क्यांपेक्षा कमी आहे. यामुळे या क्षेत्रात भविष्यात वाढीसाठी अफाट संधी उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे, सोलरचा हा विस्तार आता केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नसून द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी शहरे आणि ग्रामीण भागातही ईएमआय-आधारित सोलरचा वापर वेगाने वाढतो आहे. तंत्रज्ञानाची परिपक्वता, सरकारी पाठिंबा आणि परवडणारे कर्ज यामुळे भारतीय कुटुंबे ऊर्जा स्वावलंबनाकडे वेगाने वाटचाल करत आहेत.

Auto Taxi Fare Hike : मुंबईकरांना झटक्यावर झटके! वाढत्या महागाईत ऑटो, टॅक्सीच्या भाड्यातही वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू

Web Title: Rooftop solar emi scheme financing making solar affordable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • EMI Option
  • Government
  • Solar Panel

संबंधित बातम्या

E10 Vs E20 Petrol : शाप की वरदान? E 20 च्या वादात सरकारचा नवा निर्णय! पंपावर E 10 ची एन्ट्री, नेमका काय आहे प्लॅन?
1

E10 Vs E20 Petrol : शाप की वरदान? E 20 च्या वादात सरकारचा नवा निर्णय! पंपावर E 10 ची एन्ट्री, नेमका काय आहे प्लॅन?

Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण
2

Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या
3

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या

अकोल्यात 53 हजार ग्राहकांनी उभारले सौर प्रकल्प; सूर्यघर योजनेला मिळतोय उत्तम प्रतिसाद
4

अकोल्यात 53 हजार ग्राहकांनी उभारले सौर प्रकल्प; सूर्यघर योजनेला मिळतोय उत्तम प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.