Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupee vs Dollar: डॉलरला झटका! अचानक का मजबूत होतोय भारतीय रुपया? सलग चौथ्या दिवशी दमदार कामगिरी; ही आहेत महत्त्वाची कारणं

Rupee vs Dollar : जागतिक बाजारातील घडामोडींदरम्यान भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरला जोरदार टक्कर देत सलग चौथ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातील वाढता भरवसा आणि अशा इतर कारणांमुळे रुपयाला मोठं बळ मिळालं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 07:14 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डॉलरला दणक्यात झटका!
  • अचानक का मजबूत होतोय भारतीय रुपया?
  • सलग चौथ्या दिवशी दमदार कामगिरी
Rupee vs Dollar : मागील काही काळापासून अत्यंत वाईट कामगिरी करत असलेल्या भारतीय चलनासाठी रुपया चांगली बातमी आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशीही रुपया मजबूत राहिला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया (Rupee vs Dollar)16 पैशांनी मजबूत झाला आणि 95.66 वर बंद झाला. शेअर बाजारातील वाढ, विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात पैशाची गुंतवणूक, डॉलरची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील स्थिरता यामुळे रुपया मजबूत झाला आहे. असं सांगण्यात येत आहेत. पण नेमकी अशी कोणती कारणं आहेत ज्याचा थेट परिणाम रुपयांवर होत आहे. समजून घेऊयात.

Energy Drink Label : बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार! केंद्र सरकारचे कंपन्यांना कडक निर्देश

बुधवारी जेव्हा बाजाराची सुरुवात झाली तेव्हा रुपया प्रति डॉलर 95.70 वर उघडला होता. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान रुपया 95.48 ते 95.80 च्या श्रेणीपर्यंत पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी तो प्रति डॉलर 95.66 वर बंद झाला. याआधी मंगळवारीही रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन 95.82 वर बंद झाला होता. गेल्या चार दिवसांत रुपयाच्या मूल्यात बरीच आणि चांगली सुधारणा दिसत आहे.

रुपयाच्या मजबुतीची पाच प्रमुख कारणे

१. कच्च्या तेलाच्या किमतीतील दिलासा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे ८८ डॉलर आहेत, ज्या पूर्वी १०० डॉलरच्या वर गेल्या होत्या.
तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे भारताचे आयातीवर होणारं बील देखील कमी झाले आहे, ज्यामुळे रुपयावरील दबाव कमी झाला आहे.

२. RBI ची कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारात वेळोवेळी डॉलरची विक्री करून रुपयाची खरेदी केली आहे.
बाजारात डॉलरच्या पुरेशा पुरवठ्यामुळे रुपयाला आधार मिळाला आहे.

३. परकीय भांडवल आणि ठेवींमध्ये वाढ
सरकार आणि RBI च्या कारवाईमुळे देशात परकीय चलन आणि परकीय गुंतवणूक वाढली आहे.
यामुळे भारतीय बाजारात डॉलरची उपलब्धता अधिक मजबूत झाली आहे.

४. डॉलरची विक्री
निर्यातदार आणि बँकांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली आहे.
यामुळे बाजारात डॉलरचा पुरवठा वाढला आहे आणि रुपया मजबूत झाला आहे.

५. शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक
परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी FPI भारतीय शेअर बाजारात पुन्हा गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे भारतीय चलनही मजबूत झाले आहे. बुधवारी शेअर बाजारात प्रचंड तेजी आली.

डॉलरच्या इंडेक्समध्ये कमजोरी

सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.०४% ने घसरून १०१.२२ वर आला आहे. ज्यामुळे भारतीय रुपयाला आणखी बळकटी मिळाली आहे.

बाजारातील वातावरण आणि आकडेवारी

बुधवारी, बीएसई सेन्सेक्स ८८८ अंकांनी वाढून ७७,६५४ वर बंद झाला आणि एनएसई निफ्टी २६४ अंकांनी वाढून २४,२५० वर बंद झाला. आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी बाजारात निव्वळ ₹७५५.३३ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली.

Swiggy Zomato Boycott : स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद होणार? ‘या’ तारखेचा दिला अल्टीमेटम; नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: Rupee vs dollar why indian rupee strengthening 5 reasons marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Business News
  • dollar
  • Indian currency
  • indian rupee
  • Marathi News
  • share market

संबंधित बातम्या

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
1

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
2

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
3

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!
4

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.