ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ( सौजन्य - सोशल मीडिया )
विहंगम दृश्ये, समर्पित रूफटॉप पूल आणि ला व्हिएच्या रिसॉर्ट-स्टाईल राहणीमानाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या विचारपूर्वक डिझाइन केलेल्या सदनिकांसह उंचावलेला जीवनशैलीचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा टॉवर डिझाइन करण्यात आला आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत रुस्तमजी ग्रुपच्या रुस्तमजी अर्बानियाचे प्रोजेक्ट सीईओ श्री. अनुपम वर्मा म्हणाले, “सातत्यपूर्ण पायाभूत सुविधांचा विकास, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि प्रबळ सामाजिक रचनेच्या विकासामुळे ठाणे एमएमआरमधील सर्वात प्रस्थापित गृहनिर्माण बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. शहराचा विकास झाला, तसतसे घर खरेदीदारांच्या महत्त्वाकांक्षाही वाढल्या आहेत”.
“आज घर खरेदी करण्याचा निर्णय केवळ अपार्टमेंटपुरता मर्यादित राहिलेला नाही, खरेदीदार दर्जेदार मोकळ्या जागा आणि दीर्घकालीन मूल्यांसह उत्कृष्ट राहणीमानाचा अनुभव देणाऱ्या प्रकल्पांच्या शोधात आहेत. हा बदल बाजारपेठेची वाढती परिपक्वता आणि आजच्या खरेदीदारांच्या बदलत्या अपेक्षा दर्शवतो.
रुस्तमजीमध्ये आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, जीवनशैली प्रदान करणाऱ्या सुनियोजित परिसराची आणि विचारपूर्वक केलेल्या डिझाइनची सांगड घालून उत्तम सदनिका निर्माण केल्या जातात. रिसॉर्ट-स्टाईल राहणीमान एकात्मिक कम्युनिटीमध्ये आणण्याच्या या मूळ तत्त्वज्ञानावर ला व्हिएची संकल्पना साकारण्यात आली होती. हा नवीन टॉवर त्या दूरदृष्टीची स्वाभाविक प्रगती आहे. हा टॉवर ला व्हिए परिसंस्थेमध्ये दुर्मिळ ऑफरिंग सादर करतो, जो अधिक मोकळ्या जागा, गोपनीयता आणि अप्रतिम दृश्यांसाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे आणि या प्रकल्पाची ओळख असणाऱ्या विस्तीर्ण परिसंस्थेचा लाभही सातत्याने मिळवून देतो.”
केपेलचे मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाचे मुख्य प्रतिनिधी श्री. हो कियाम खियोंग म्हणाले, “नवीन टॉवरचे लाँच हे केपेल आणि रुस्तमजी यांच्यातील पक्क्या भागीदारीवर, तसेच ला व्हिएच्या आधीच्या टप्प्यांना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावर आधारित आहे. विचारपूर्वक डिझाइन केलेली सदनिका आणि एकात्मिक कम्युनिटीच्या फायद्यांची सांगड घालत हा टॉवर ठाण्यात वैशिष्ट्यपूर्ण राहणीमानाचा अनुभव देतो. रुस्तमजीसोबत मिळून कार्यक्षमता आणि राहण्यायोग्यतेला केंद्रस्थानी ठेवून घर खरेदीदारांच्या बदलत्या आकांक्षा पूर्ण करणारी दर्जेदार सदनिका उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
ला व्हिएमधील हा नव्याने लाँच झालेला टॉवर अधिक प्रशस्त अपार्टमेंट्स आणि क्युरेटेड जीवनशैली सुविधांसह अधिक एक्सक्लुझिव्ह निवासी अनुभव देतो. प्रत्येक सदनिका अधिक गोपनीयता आणि विस्तीर्ण राहणीमान प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, तसेच निवडक सदनिकांमध्ये रुस्तमजीची सिग्नेचर पॉड संकल्पना देखील असेल. याशिवाय रहिवाशांना लँडस्केप केलेल्या मोकळ्या जागा, रूफटॉपवरील मनोरंजनाच्या सुविधा आणि दैनंदिन सोयीसुविधांसह विस्तीर्ण ला व्हिए कम्युनिटीचा निरंतर आनंद घेता येईल.
ठाण्यातील सुप्रस्थापित माजिवडा मायक्रो-मार्केटमध्ये वसलेला ला व्हिए उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि प्रबळ सामाजिक पायाभूत सुविधांनी युक्त आहे, ज्यामध्ये माजिवडा येथे स्वतंत्र स्टेशन असलेली मुंबई मेट्रो लाईन ४ आणि ठाण्याला भिवंडी व कल्याणशी जोडणारी मेट्रो लाईन ५ यांसारख्या प्रमुख पायाभूत प्रकल्पांचा समावेश आहे. या भागाला आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग आणि छेडा नगर ते आनंद नगरला जोडणाऱ्या प्रस्तावित ईस्टर्न फ्रीवे विस्तारासह सध्या सुरू असलेल्या व आगामी पायाभूत सुविधांचा मोठा लाभ झाला आहे, ज्यामुळे प्रमुख रोजगार, व्यावसायिक आणि सामाजिक केंद्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे.
या सुधारणा माजिवड्याला उत्तम कनेक्टेड गंतव्य म्हणून विकास करण्यास अधिक मदत करत आहेत आणि मायक्रो-मार्केटमधील प्रत्यक्ष वापरकर्त्यांची सातत्यपूर्ण मागणी टिकवून ठेवण्यास हातभार लावत आहेत. ला व्हिएचे यशस्वी लाँच आणि मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हा नवीन टॉवर ठाण्यातील प्रीमियम निवासी सुविधांच्या पुढील टप्प्याची सुरुवात आहे.
Ans: हा ५८ मजल्यांचा स्वतंत्र टॉवर असून यामध्ये ९३० ते ९८० चौरस फूट आकाराचे ३ बीएचके फ्लॅट्स, समर्पित रूफटॉप पूल, सिग्नेचर पॉड संकल्पना आणि रिसॉर्ट-स्टाईल राहणीमानाचा अनुभव मिळणार आहे.
Ans: हा प्रकल्प ठाण्यातील सुप्रस्थापित 'माजिवडा' मायक्रो-मार्केटमध्ये वसलेला आहे, जो मुंबई आणि एमएमआरशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीने जोडलेला आहे.
Ans: मुंबई मेट्रो लाईन ४ माजिवडा स्टेशन, मेट्रो लाईन ५ ठाणे-भिवंडी-कल्याण, आनंद नगर-साकेत उन्नत मार्ग आणि ईस्टर्न फ्रीवेच्या प्रस्तावित विस्ताराचा थेट फायदा होत आहे.






