
Samsung Layoff In India ( सौजन्य - सोशल मीडिया )
दर दुसरीकडे, सप्टेंबरच्या पहिल्या 10 दिवसांत जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रातील 6300 हून अधिक नोकऱ्या कमी झाल्याचे बातमी समोर येत आहे. उबर, पेपल, झोमॅटो, ॲपल आणि ओरॅकल यांसारख्या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. ज्या कंपन्यांची अद्याप कर्मचारी कपात केलेल्याचं वृत्त लागू केलेलं नाही त्या कंपन्यासुद्धा आता कर्मचारी कपातीच्या तयारी आहेत. कोणत्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात आणि कोणत्या कंपनीचा समावेश आहे?
सॅमसंग इंडियामधील कर्मचारी कपात टेलिव्हिजन आणि घरगुती उपकरणे या व्यवसायात असलेल्या कर्मचाऱ्यांची झाली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनीने संचालक-स्तरीय अधिकारी, टीम लीडर आणि व्यवस्थापक यांच्यासह विविध पदांवरील लोकांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून काढले जात नाहीये. कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कामावरून काढले जात आहे. काही कर्मचाऱ्यांना तर नोटीस कालावधी पूर्ण न करताच कंपनी सोडण्यास सांगितले आहे.
यामागील मुख्य कारण म्हणजे वाढता खर्च आणि व्यवसायावरील दबाव हा आहे. कंपन्यांना कमी संसाधनांमध्ये अधिक काम करून नफ्यावरील दबाव कमी करायचा आहे. सॅमसंगच्या बाबतीत, मेमरी चिप्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय, रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीचा खर्चही वाढला आहे. दरम्यान, भारतातील स्मार्टफोन विक्रीतही घट झाली आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या १० दिवसांत, जगातील अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. उबरने अंदाजे ३,३०० नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. जे त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ सुमारे १० टक्के इतकी आहे. पेपल भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे ४ टक्क्यांनी कमी करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे अंदाजे २२० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. झोमॅटो आणि ॲपलने मिळून अंदाजे २५० पदे रद्द केली आहेत. ओरॅकलदेखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे.
बदलणारे तंत्रज्ञान हे देखील कर्मचारी कपातीचे एक कारण आहे. कंपन्या आता एआय तंत्रज्ञानामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. यामुळे, पूर्वी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांकडून हाताळली जाणारी काही कामे कमी होत आहेत. कंपन्या महामारीच्या काळात निर्माण झालेल्या अतिरिक्त कर्मचारी संख्येच्या समस्येवरही उपाययोजना करत आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनी दिवाळीनंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा फेरविचार करू शकते. सध्या, मोबाईल व्यवसायात कोणतीही मोठी कर्मचारी कपात नियोजित नाही.