Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

India Sea Dam Project : भारत एक अत्यंत खडतर आणि ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प साकारण्याच्या तयारीत आहे. भारताकडून समुद्रावर तब्बल ६४ किलोमीटर लांब धरण बांधले जाणार आहे. याद्वारे ७८०० लाख क्यूबिक मीटर गोडे पाणी साठवण्याचे महाकाय उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 02:11 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारताचा सर्वात मोठा Water Project!
  • समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam
  • पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
India Sea Dam Project : महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहतो. दुष्काळ भागात तर पाण्यासाठी बरीच मरारामारी असते. याचं मुख्य कारण म्हणजे गोड्या पाण्याचा साठा. जितका पाऊस पडतो ते सगळं पाणी नदीच्या माध्यामातून समुद्राला जाऊन मिळतं. ते रोखणं जवळजवळ अशक्य आहे. मात्र भारत हे अशक्य शक्य करण्याच्या तयारीत आहे. भारतात एक असा प्रकल्प विकसित होत आहे. जो नदीचं पाणी समुद्रात जाण्यापासून रोखणार आहे. आणि त्याचा विविध कामांसाठी उपयोग केला जाईल. या प्रकल्पामुळे अनेक आर्थिक फायदे मिळणार आहेत. नेमका काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊयात.  ( India Sea Dam Project ) 

Social Security Fund : डिलिव्हरी बॉईज, ड्रायव्हर्सना सरकारकडून संरक्षण? PF, विमा अन् Pension चा मिळणार लाभ; काय आहे योजना ?

गुजरातचा कल्पसर प्रकल्प

आपण महत्त्वाकांक्षी कल्पसर प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. हा जगातील सर्वात मोठा किनारी गोड्या पाण्याचा जलाशय असेल, जो गुजरात सरकारद्वारे खंभातच्या आखातात बांधला जाणार आहे. हा प्रकल्प समुद्राच्या एका भागावर धरण बांधून, अंदाजे ७,८०० दशलक्ष घनमीटर (MCM) गोड्या पाण्याचा समुद्रात होणारा प्रवाह रोखेण्यासाठी बांधण्यात येणार आहे. यामुळे गुजरातच्या दुष्काळग्रस्त सौराष्ट्र प्रदेशाला पाणीपुरवठा होईल. तसेच देशभरातील अशा बऱ्याच दुष्काळी भागींची तहान भागवण्याचं महत्त्वाचं काम करेल.

मोठं सरोवर केल जाणार तयार

खंभातच्या आखातात सुमारे ६० ते ६४ किलोमीटर लांबीचे धरण किंवा बंधारा बांधून एक मोठे गोड्या पाण्याचे किनारी जलाशय तयार केले जाणार आहे. यामध्ये साबरमती, माही, धाधर आणि नर्मदा यांसारख्या नद्यांमधील वाहून येणारे पाणी जमा होईल. यामुळे सुमारे १,६०० ते २,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले, जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असणार आहे.

या प्रोजेक्टवर कोण करतंय काम?

कल्पसर प्रकल्प गुजरात सरकारकडून विकसित केला जात आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार आणि नेदरलँड्सकडून तांत्रिक साहाय्य मिळत आहे. नेदरलँड्सची कंसल्टेंसी कंपनी या प्रकल्पाची चौकट आणि तांत्रिक साहाय्य पुरवत आहे.

यासाठी किती खर्च येईल?

गुजरातच्या कल्पसर प्रकल्पाचा अंदाजित एकूण बांधकाम खर्च ₹१.२५ लाख कोटी ते ₹१.३३ लाख कोटींच्या दरम्यान आहे. गुजरातच्या कल्पसर प्रकल्पाचे सध्याचे सचिव के. बी. राबरिया आहेत, जे या प्रकल्पावर देखरेख करत आहेत.

प्रकल्पाचे आर्थिक फायदे काय आहेत?

  • सौराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमधील ४२ तालुक्यांमधील अंदाजे १० लाख हेक्टर शेतजमिनीला सिंचनासाठी गोडे पाणी मिळेल.
  • पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे पिकांचे नुकसान कमी होईल आणि कृषी उत्पादकता वाढेल.
  • खंभातच्या आखातावरील धरणावरून बांधण्यात येत असलेल्या रस्ते आणि रेल्वे मार्गामुळे भावनगर आणि सुरतमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल.
  • प्रवासाचे अंतर कमी झाल्यामुळे वाहतूक आणि इंधनाच्या खर्चात बचत होईल, ज्यामुळे व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल.
  • या प्रकल्पातून अंदाजे २,४७० मेगावॅट सौर आणि पवन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
  • जगातील सर्वात मोठ्या किनारी गोड्या पाण्याच्या जलाशयांपैकी एकाची निर्मिती झाल्यामुळे पिण्याच्या आणि औद्योगिक गरजांसाठी पाणीपुरवठा सुलभ होईल.
बल्ले बल्ले… NSE IPO चा बाजारात धुमाकूळ! ग्रे मार्केटमध्ये ₹300 चा प्रीमियम; सरकारी विमा कंपन्यांना जॅकपॉट

Web Title: India to build 64 km long sea dam to store 7800 lakh cubic meter water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Drinking Water
  • india

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक
3

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक

Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणाची चिंता वाढली, ऑगस्ट संपला तरी धरण तहानलेलेच; पाणीसाठा फक्त ४८.५१%
4

Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणाची चिंता वाढली, ऑगस्ट संपला तरी धरण तहानलेलेच; पाणीसाठा फक्त ४८.५१%

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.