Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI ATM Fraud : ग्राहकासोबत ATM फ्रॉड, बँकच ठरली दोषी? नुकसानभरपाई देणार SBI; कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

SBI ATM Fraud : ATM Fraud प्रकरणात ग्राहकाला योग्य पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज देता आले नाहीत म्हणून SBI ला मोठा फटका बसला आहे. बँकेच्या या निष्काळजीपणामुळे ग्राहकाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी बँकेला मोठी भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 07:03 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकासोबत ATM फ्रॉड
  • नुकसानभरपाई देणार SBI
  • कोर्टाचा मोठा निर्णय
SBI ATM Fraud : प्रत्येकजण आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचतीसाठी बँकेत जमा करतो. गरजेनुसार ते पैसे काढतो आणि पुन्हा जमाही करू शकतात. पण कल्पना करा की, जर तुमचे कष्टाचे पैसे बँकेत आहेत आणि अचानक तुमच्या नकळत तुमच्या खात्यातून लाखो रुपये काढले जातात. कोणीही घाबरून जाईल आणि ताबडतोब बँकेकडे तक्रार करेल. मात्र, जर बँक व्यवहाराशी संबंधित कोणतीही कागदपत्रे देऊ शकली नाही, तर प्रकरण गंभीर बनतं. मग तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे कोण देणार? ( SBI ATM Fraud ) 

Speciality Restaurants New CEO : अवीक चॅटर्जी स्पेशलिटी रेस्टॉरंट्सचे नवे सीईओ; मेनलँड चायनासह अनेक ब्रँड्सची सांभाळणार धुरा

अशीच काहीशी परिस्थिती या एक प्रकरणात घडली. एसबीआयच्या एका ग्राहकासोबत हा प्रकार घडला. ज्यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय एक लाखांहून अधिक रुपये काढून हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण ग्राहक आयोगापर्यंत पोहोचले, ज्याने बँकेला आदेश दिलेत की ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी.

बँकेला द्यावी लागली नुकसान भरपाई

या प्रकरणात, दिल्ली राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने बँकेला ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला, ज्यामध्ये ₹१.३० लाख परत करणे आणि अतिरिक्त ₹१०,००० देणे यांचा समावेश आहे. शिवाय, हे प्रकरण १२ ऑक्टोबर २०१८ रोजीचे असल्याने, आयोगाने त्या तारखेपासून रकमेवर ६% वार्षिक व्याज देण्याचाही आदेश दिला.

खात्यातून पैसे कसे काढले गेले?

एकाच दिवसात ग्राहकाच्या खात्यातून चार एटीएम व्यवहार झाले, ज्यात ₹८०,००० काढण्यात आले. याशिवाय, ₹४०,००० आणि ₹१०,००० चे दोन स्वतंत्र बँक हस्तांतरण देखील करण्यात आले. ग्राहकाच्या खात्यातून एकूण ₹१.३० लाख काढण्यात आले.

ATM व्यवहारांचे CCTV फुटेज मागितले

पैसे कोणी काढले हे ओळखण्यासाठी ग्राहकाने बँकेकडे एटीएम व्यवहारांच्या सीसीटीव्ही फुटेजची विनंती केली. असे असूनही, एसबीआयने ग्राहक आयोगाला व्यवहारांशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज किंवा नोंदी देवू शकली नाही.

ग्राहकाला हे कधी समजले?

जेव्हा ग्राहकाने आपले पासबुक अपडेट केलं, तेव्हा त्याच्या लक्षात आले की काही दिवसांपूर्वी त्याच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली होती. त्यानंतर त्याने बँकेकडे तक्रार दाखल केली, जी नंतर दिल्ली राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे पाठवण्यात आली.

तुमच्यासोबत ATM फ्रॉड झाला तर हे करा

तुमच्या बँक खात्यातून एखादा अज्ञात व्यवहार झाल्यास, तुमच्या बँकेला तात्काळ कळवा.
एटीएम फसवणूक झाल्यास, तुमचे कार्ड तात्काळ ब्लॉक करा.
व्यवहाराचा तपशील, जसे की तारीख, रक्कम आणि वेळ, लिहून घ्या.
बँकेकडे लेखी तक्रार दाखल करा.
पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करा.
आवश्यक असल्यास, बँकेकडून व्यवहाराच्या नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेज मागा.
व्यवहाराशी संबंधित सर्व पुरावे जपून ठेवा.
जर बँक तुमचे म्हणणे ऐकून घेत नसेल किंवा समस्येवर तोडगा काढत नसेल, तर तुम्ही ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकता.

India Electricity Export : भारत बनला ‘पावर हाऊस’! ‘या’ देशांना वीज पुरवून कमावतोय कोट्यवधी रुपये

Web Title: Sbi atm fraud pay heavy compensation customer over cctv footage failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Atm Bank
  • ATM Money
  • ATM Theft
  • Bank Fraud
  • Business
  • Business News
  • CCTV
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

Bank Strike आधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणत्याही ATM मधून Free पैसे काढा, सरकारी बँकांनी हटवले चार्जेस
1

Bank Strike आधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणत्याही ATM मधून Free पैसे काढा, सरकारी बँकांनी हटवले चार्जेस

Bank Strike Update : 3 दिवस बँका बंद राहणार! UPI आणि ATM वर काय परिणाम होणार? व्यवहार करण्यापूर्वी ‘ही’ माहिती नक्की वाचा
2

Bank Strike Update : 3 दिवस बँका बंद राहणार! UPI आणि ATM वर काय परिणाम होणार? व्यवहार करण्यापूर्वी ‘ही’ माहिती नक्की वाचा

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
3

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

SBI Free Online Courses: करिअरला द्या नवी दिशा! SBI च्या ‘या’ फ्री ऑनलाईन कोर्सेसमधून मिळवा फायनान्सचे धडे
4

SBI Free Online Courses: करिअरला द्या नवी दिशा! SBI च्या ‘या’ फ्री ऑनलाईन कोर्सेसमधून मिळवा फायनान्सचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.