Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI चा मोठा इशारा! YONO युजर्सना कंगाल करताहेत Scammer; विसरूनही करू नकात ‘या’ चूका

भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना एक इशारा जारी केला आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत सध्या कशा प्रकारचे स्कॅम होता आहेत याबाबत स्पष्ट ताकीद दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 05, 2026 | 04:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणही तितकंच वाढत
  • ‘YONO’ ॲपच्या वापरकर्त्यांसाठी सतर्कतेचा इशारा
  • बँकेचे अधिकारी असल्याचं भासवून कॉल 
YONO Scam Alert: भारताचे अधिकाधिक डिजिटलीकरण होत असतानाच, फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणही तितकंच वाढत आहे. डिजिटल बँकिंग क्षेत्रात फसवणूक करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जवळपास दररोजच, नागरिक विविध फसवणुकीच्या जाळ्यात अडकून बळी पडल्याच्या बातम्या समोर येत असतात. या सगळ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना एक इशारा जारी केला आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत सध्या कशा प्रकारचे स्कॅम होता आहेत याबाबत स्पष्ट ताकीद दिली आहे.

DA Hike: Bank कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार! महागाई भत्त्यात मोठी वाढ; कोणाच्या खात्यात किती रुपये जमा होणार ?

‘YONO’ ॲपच्या वापरकर्त्यांसाठी सतर्कतेचा इशारा

बँकेने विशेषतः आपल्या ‘YONO’ ॲपच्या वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत असल्याचे SBI ने अधोरेखित केले आहे; आणि सावधगिरी बाळगण्यात झालेली अगदी किरकोळ चूकही तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होण्यास कारणीभूत ठरू शकते.

YONO च्या नावाने फसवणूक

अलीकडच्या काळात, फसवणूक करणारे गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘YONO SBI’ च्या नावाने बनावट पेजेस तयार करत आहेत आणि त्याद्वारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गुन्हेगार दिशाभूल करणाऱ्या ‘स्पॉन्सर्ड’ जाहिराती चालवतात, ज्यामध्ये “तुम्ही तुमचे युजरनेम किंवा पासवर्ड विसरला आहात का? ते त्वरित परत मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा,” अशा प्रकारचे संदेश पाठवतात. या पार्श्वभूमीवर, SBI ने वापरकर्त्यांना एक स्पष्ट इशारा दिला आहे. बँकेने म्हटले आहे की, अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका; कारण त्या पूर्णपणे बनावट असतात आणि त्यांचा वापर तुमची बँकिंग संबंधित क्रेडेंशियल्स चोरण्यासाठी केला जाऊ शकतो.

सावध राहा, सतर्क राहा

जर एखाद्या वापरकर्त्याने अशा लिंकवर क्लिक केले आणि आपली वैयक्तिक माहिती तिथे भरली, तर त्यांना त्वरित फसवणुकीचा बळी बनण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी, बँक वापरकर्त्यांना असा सल्ला देते की, त्यांनी नेहमी अधिकृत ‘YONO SBI’ ॲप किंवा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. तसेच, कोणत्याही अनोळखी लिंक, संदेश किंवा फोन कॉल्सना प्रतिसाद म्हणून आपली कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही सामायिक करणे टाळावे. विशेषतः, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कधीही तुमचा OTP किंवा पासवर्ड कोणाशीही सामायिक करू नये.

बँकेचे अधिकारी असल्याचं भासवून कॉल

शिवाय, SBI च्या माहितीनुसार, फसवणूक करणारे लोक बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून फोन कॉल, SMS किंवा ईमेलद्वारे तुमच्याशी संपर्क साधू शकतात. KYC अपडेट, खाते निलंबित होणे किंवा रिवॉर्ड पॉइंट्सचे आमिष यांसारख्या विविध सबबींचा वापर करून, ते वापरकर्त्यांकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. बँकेने हे स्पष्ट केले आहे की, कोणताही अधिकृत अधिकारी फोनवर किंवा मजकूर SMS द्वारे कधीही OTP, PIN, पासवर्ड किंवा कार्डचे तपशील मागणार नाही. जर कोणी तसे केले, तर ती व्यक्ती निःसंशयपणे एक फसवणूक करणारी व्यक्ती आहे. विशेषतः ‘YONO SBI’ ॲप वापरणाऱ्यांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे, कारण हे ॲप्लिकेशन थेट त्यांच्या बँक खात्यांशी जोडलेलं असतं.

ज्या नंबरवरून बँक कॉल करते

बँकेच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सबाबत सावध राहण्याचा सल्ला बँकेने वापरकर्त्यांना दिला आहे. साधारणपणे, SBI कडून येणारे अधिकृत कॉल 1600 ने सुरू होणाऱ्या क्रमांकांवरून येतात. जर तुम्हाला इतर कोणत्याही क्रमांकावरून कॉल आला, तर तो संशयास्पद मानावा आणि कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारे फसवणुकीचे बळी ठरला असाल, तर उशीर करू नका; तक्रार नोंदवण्यासाठी त्वरित National Cyber ​​Crime Helpline क्रमांक १९३० वर कॉल करा. तुम्ही cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन तक्रार देखील दाखल करू शकता.

संघर्षातून उद्योजकतेकडे! विदर्भातील महिलांचे सक्षमीकरण: आर्थिक स्‍वावलंबीत्वाचा नवा मार्ग

Web Title: Sbi warning for customers to not fall for yono new scheme scams see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Fraud
  • Business News
  • High Alert
  • Marathi News
  • SBI

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा
1

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
3

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
4

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.