Bill Gates यांची Epstein Files वर धक्कादायक कबुली (Photo Credit- X)
नुकत्याच सार्वजनिक झालेल्या ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये बिल गेट्स यांचे काही महिलांसोबतचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये त्या महिलांचे चेहरे झाकलेले आहेत. या फोटोंबाबत स्पष्टीकरण देताना गेट्स म्हणाले की, “हे फोटो बिझनेस मीटिंगनंतर जेफ्री एपस्टीनच्या सांगण्यावरून काढण्यात आले होते. त्या वेळी तेथे एपस्टीनचा अधिकृत स्टाफदेखील उपस्थित होता.” तसेच, आपण कधीही एपस्टीनच्या पीडितांसोबत किंवा त्यांच्या आसपास असलेल्या महिलांसोबत वेळ घालवला नसल्याचा दावा त्यांनी आवर्जून केला.
Bill Gates apologized to staff at the Gates Foundation over his past ties to Jeffrey Epstein and infidelity in his marriage. According to a foundation spokesperson cited by Reuters, Gates held a meeting where he answered questions about newly released documents related to the… pic.twitter.com/TJYmBLUOwB — Visegrád 24 (@visegrad24) February 25, 2026
AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय
जेफ्री एपस्टीन याच्याशी मैत्री ठेवणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली बिल गेट्स यांनी या वेळी दिली. “एपस्टीनसोबत वेळ घालवणे आणि गेट्स फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्या बैठकींमध्ये सहभागी करून घेणे, हा माझा अत्यंत चुकीचा निर्णय होता,” असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांसमोर जाहीर माफी मागितली. “हे सर्व माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे घडले. माझ्यामुळे ज्या निष्पाप लोकांना या वादात ओढले गेले, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो,” अशा शब्दांत त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला.
एपस्टीनसारख्या वादग्रस्त व्यक्तीशी नाव जोडले गेल्यामुळे बिल गेट्स आणि त्यांच्या ‘गेट्स फाउंडेशन’च्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, हे त्यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. गेल्या काही दिवसांपासून जेफ्री एपस्टीनशी संबंधित नवीन कागदपत्रे आणि गोपनीय दस्तावेज सार्वजनिक होत आहेत. यामुळे जागतिक स्तरावरील अनेक बड्या व्यक्तींची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली असून, बिल गेट्स यांनी या पार्श्वभूमीवर दिलेली ही कबुली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर






