नववर्षात श्रीमंत व्हायचंय... या 18 शेअर्सवर ठेवा लक्ष, प्रत्येक स्टॉकवर मिळेल मोठा नफा!
चालू ट्रेडिंग आठवड्यात शेअर बाजारात माेठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मागील 6 महिन्यांतील सर्वाधिक साप्ताहिक वाढीसह बंद झाले आहे. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई आणि अंदाजानुसार आरबीआयचे धोरण यामुळे बुल्सने बाजारात वर्चस्व गाजवले आहे.
चालू आठवड्यात सेन्सेक्स 1,906.33 अंकांनी वाढून 81,709.12 वर बंद झाला आहे. तर निफ्टी देखील या आठवड्यात 546.7 अंकांनी वधारला आहे. दरम्यान, अनेक शेअर्समध्येही नेत्रदीपक वाढ दिसून आली आहे. या आठवड्यातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या 5 शेअर्सबद्दल जाणून घेऊया.
1. बँग ओव्हरसीज – चालू आठवड्यातील हा सर्वाधिक परतावा देणारा बँग ओव्हरसीजचा शेअर्स ठरला आहे. गेल्या 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 70.73 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. बँग ओव्हरसीज ही एक अतिशय छोटी कंपनी आहे. जी गारमेंट्स आणि परिधान उद्योगात व्यवसाय करते. कंपनीचे मार्केट कॅप 128.01 कोटी रुपये इतके आहे. शुक्रवारी (ता.८) 6 डिसेंबर रोजी शेअर्स 6.85 टक्क्यांच्या उसळीसह बीएसईवर 94.40 रुपयांवर बंद झाले आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसानचे 12000 रुपये मिळणार? अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न!
2. रघुवीर सिंथेटिक्स – रघुवीर सिंथेटिक्सच्या शेअर्सने गेल्या 5 दिवसांत 67.62 टक्के परतावा दिला आहे. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. जी कापड उत्पादने उद्योगात व्यवसाय करते. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 1,052.26 कोटी रुपये इतके आहे. शुक्रवारी (ता.6) रोजी शेअर्स 4.99 टक्क्यांच्या उसळीसह बीएसईवर 271.55 रुपयांवर बंद झाले आहे.
3. माधव काॅपर – गेल्या 5 दिवसांत माधव कॉपरच्या शेअर्समध्ये 61.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही कंपनी गुंतवणूक व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 220.13 कोटी रुपये इतके आहे. शुक्रवारी (ता.6) रोजी शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 81.10 रुपयांवर बंद झाले आहे.
4. ट्रान्सस्टील सिटिंग टेक्नॉलॉजीज – ट्रान्सस्टील सीटिंग टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 5 दिवसात 56.4 टक्के वधारले आहेत. ही कंपनी फर्निचर होम फर्निशिंग उद्योगात व्यवसाय करते. तिचे मार्केट कॅप सुमारे 146.80 कोटी रुपये इतके आहे. शुक्रवारी (ता.6) शेअर्स 2.32 टक्क्यांच्या वाढीसह 72.75 रुपयांवर बंद झाले आहे.
5. सुपीरियर इंडस्ट्रियल एंटरप्राइजेज – सुपीरियर इंडस्ट्रियल एंटरप्राइझच्या शेअर्सने या आठवड्यात गुंतवणूकदारांना 50.81टक्के परतावा दिला आहे. ही देखील एक अतिशय छोटी कंपनी असून, ती खाद्यतेल उद्योगात व्यवसाय करते. कंपनीचे मार्केट कॅप 123.03 कोटी रुपये इतके आहे. शुक्रवारी (ता.6) शेअर्स बीएसईवर 19.99 टक्क्यांच्या उसळीसह 88.83 रुपयांवर बंद झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)