NDA's Mission compleated in Bihar still the stock market down why? (photo-social media)
Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा फडवकण्याची शक्यता असली तरीही, शेअर बाजार घसरले आहे. बिहारमधील निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी50 14 नोव्हेंबरला घसरली आहे. बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट अस्थिर दिसून येत आहे. त्यामुळे बाजार उघडताच बेंचमार्क निफ्टी घसरला असून त्याचा व्यवहार जवळपास 25,850 असा होत आहे. आदल्या दिवशीपेक्षा 30 अंकांनी मागे आहे. तसेच, सेन्सेक्सचा व्यवहार सुद्धा 84,060 वर होत आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात मंदी दिसत होती. मात्र, दुपारनंतर बिहारमधील परिस्थिती जशी स्पष्ट होत गेली तरीही बाजारात विक्री सुरू आहे. यामुळे बिहारमध्ये NDA भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवणार असूनही नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : Vi Share Market Update: 10 रुपयांचा छोटा स्टॉक ठरतोय ‘बडा धमाका’ गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार?
पण सेन्सेक्स-निफ्टीला धक्का का?
बिहारच्या सत्तेमध्ये एनडीए आघाडीवर असूनही गुंतवणूकदार सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. कारण, निवडणुकीभोवती फिरत असलेली अनिश्चितता आणि राजकीय वातावरणाचा परिणाम स्पष्टपणे शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. यामुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात मार्केट उघडताच बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून लाल रंगात होते.
बिहार राज्यात एनडीएचा सत्ता स्थापन करायचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी जागतिक बाजार कमकुवत झाल्याने आणि परदेशी कंपन्या बाहेर पडल्याने त्यांनी बाजाराला खाली खेचले आहे. त्यातही, गुंतवणूकदार बिहार निवडणुकीच्या निकालावर लक्ष केन्द्रित करून बसले आहेत. जर, एनडीएची सत्ता स्थापित झाली तर शेअर मार्केटमध्ये लक्षणीय लाट येऊ शकते. ज्यामुळे गुंतवणूकदार आनंदित होऊ शकतात.
इन्फोसिस, टाटा स्टील आणि टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांचे सेन्सेक्समध्ये शेअर्स घसरले आहे. याउलट अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स आणि ट्रेंट या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मात्र वाढ झाली आहे. यासोबतच जिओ फायनान्शियल यांचे ही भाव वधारले आहेत. यामुळे बाजारात संमिश्र वातावरण निर्माण झाले होते. जागतिक हालचाली, FII रोख विक्री आणि बिहार निवडणुकीच्या अंतिम निकालांपूर्वी गुंतवणूकदार सावध राहिल्याने त्याचा थेट परिणाम शेअर्स बाजारावर झाला.






