(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्यातील मतभेद आणि वेगळेपणाच्या बातम्यांदरम्यान, अभिनेत्रीने ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्यावरील आरोप आणि अफवांना उत्तर दिले.
ऐश्वर्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “मी कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा गैरवर्तन केले नाही, मला सतत ट्रोल केले जात आहे, जे मी नेहमीच हसत सगळे सहन केले आहे. माझ्याविरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या अफवा खोट्या आहेत आणि सत्य कळण्यापूर्वी लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.”
ऐश्वर्या म्हणाली की तिने कधीही कोणाला त्रास दिला नाही, उलट ती स्वतःही छळाची बळी आहे, जी लोकांना लगेच दिसून येत नाही. तिने लोकांना आवाहन केले की त्यांनी व्यक्तींची ओळख न करता त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवू नये. तिने असेही म्हटले की तिच्या लग्नापासून तिला सतत ट्रोल केले जात आहे. ऐश्वर्या म्हणाली की अनोळखी लोक तिला मेसेज आणि यूट्यूब लिंक्स पाठवतात, ज्यामध्ये तिच्याबद्दल खोट्या स्टोरी लिहिल्या जातात.”जणू काही मी एखाद्याला त्रास दिला आहे, एखाद्याला कानाखाली मारली आहे किंवा एखाद्याशी गैरवर्तन केले आहे आणि तसे नाही.
ऐश्वर्या शर्माने शेवटी म्हटले की ती नेहमीच शांत राहिली आहे आणि याचा अर्थ असा नाही की काहीही चुकीचे घडले आहे. तिने तिच्या आयुष्यात कधीही कोणालाही त्रास दिला नाही आणि लोक खोटे बोलत आहेत. त्यांनी त्यांच्या कृतींबद्दल जागरूक असले पाहिजे. काहीही चुकीचे बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. काही लोक शांत असतात आणि मीही तशीच आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलत राहू शकता.

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….
नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांची पहिली भेट “घुम है किसीके प्यार में” या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. सेटवरची त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि एका वर्षातच त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र दिसले. ते “बिग बॉस १७” मध्येही दिसले, जिथे त्यांच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले.






