बाजार घसरणीतही रॉकेट वेगाने धावतोय 'हा' शेअर; आणखी 55 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता!
शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या मोठ्या घसरणीदरम्यान रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिग्नेचर ग्लोबल इंडियाचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रडारवर आहेत. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी हा शेअर सुमारे 4 टक्क्यांनी वाढला. ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 1318.10 रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 3.82 टक्क्यांनी वाढला आणि 1303.20 रुपयांवर बंद झाला आहे. शुक्रवारी शेअर बाजारात बंद होता तसेच शनिवार रविवार आता साप्ताहिक सुट्टी असल्याने सोमवारी सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) च्या शेअर्सवर लक्ष असणार आहे. कारण तज्ज्ञही त्यावर उत्साही दिसत आहेत. तज्ज्ञांचा अंदाज आहे की शेअर 55 टक्क्यांहून अधिक वाढू शकतो.
(फोटो सौजन्य – istock)
ब्रोकरेजचे मत काय?
प्रमुख ब्रोकरेज कंपन्यांनी मजबूत तिमाही निकाल नोंदवल्यानंतर सिग्नेचर ग्लोबल इंडियावर सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. काही ब्रोकरेजने त्यांच्या लक्ष्य किमतीही वाढवल्या आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज मोतीलाल ओसवाल यांनी सिग्नेचर ग्लोबल शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने शेअरची लक्ष्य किंमत 2007 रुपये ठेवली आहे. तर मोतीलाल ओसवाल यांनी प्रति शेअर 2,000 रुपये उद्दिष्ट दिले आहे. हे शेअरसाठी अंदाजे 56 टक्क्यांची वाढ दर्शवते.
हे देखील वाचा – एलॉन मस्क एका मिनिटाला कमावतात इतके कोटी रुपये; आकडा… वाचून चाट पडाल…!
मालमत्तांच्या बुकिंकमध्ये वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत (2024-25) सिग्नेचर ग्लोबलची विक्री बुकिंग जवळपास तिप्पट वाढून 2,780 कोटी रुपये झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (2023-24) ते 980 कोटी रुपये होते. कंपनीची विक्री बुकिंग चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जवळपास तिपटीने वाढून 5,900 कोटी झाली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 1,860 कोटी होती. 2023-24 या आर्थिक वर्षात सिग्नेचर ग्लोबलची विक्री बुकिंग 7,270 कोटी रुपये होती. कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी 10,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सिग्नेचर ग्लोबलचे तिमाही निकाल
कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 4.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत 19.92 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. एकूण उत्पन्न गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत 121.16 कोटींवरून वाढून 777.42 कोटी झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)