एसपीजेआयएमआरकडून लघु व्यवसाय उद्योजकांना सक्षम करण्यासाठी उपक्रम ‘सशक्त’ लॉंच
भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजेमेंट अँड रिसर्च (एसजीजेआयएमआर) च्या सेंटर फॉर फॅमिली बिझनेस अँड आंत्रेप्रीन्युअरशीप (सीएफबीई) ला नवीन समुदाय-केंद्रित उपकम ‘सशक्त’च्या लॉंचची घोषणा करताना आनंद होत आहे. या उपक्रमाचा मुंबईतील अंधेरी के-पश्चिम वॉर्ड येथील वंचित पार्श्वभूमींमधील लघु व्यवसाय उद्योजकांना (एसबीई) सक्षम करण्याचा मनसुबा आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होत मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ज्ञान व कौशल्ये देतो, ज्यामुळे या उद्योजकांना शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यास आणि त्यांची आर्थिक स्थिरता प्रबळ करण्यास मदत होत आहे.
सशक्त उपक्रम सूक्ष्म-उद्योग ऑपरेट करणाऱ्या २५ ते ३० वर्ष वयोगटातील स्थानिक उद्योजकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. एसजीजेआयएमआरच्या अभ्युदय प्रोग्राममधून निवडण्यात आलेल्या सहभागींना मोफत शिक्षण व मेन्टोरशीप मिळेल, जेथे वंचित समुदायांमधील तरूणांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. तीन महिन्यांमध्ये संरचित अभ्यासक्रम हिंदीमध्ये व्यावहारिक, प्रत्यक्ष अध्ययन सत्रे देईल, ज्यामधून उपलब्धता आणि संबंधितपणाची खात्री मिळेल. प्रत्येक सत्रामध्ये आर्थिक व्यवस्थापन, मार्केटिंग, कार्यसंचालन व नेतृत्व अशा आवश्यक क्षेत्रांबाबत माहिती देण्यात येईल. ज्यामुळे सहभागी यशासाठी आवश्यक टूल्ससह सक्षम होतील.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
एसपीजेआयएमआर नेटवर्कमधील शिक्षकवर्ग व माजी विद्यार्थी वैयक्तिकृत मार्गदर्शन देतील, तसेच सहभागींना त्यांच्या व्यवसायामधील अद्वितीय आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आणि विकासाच्या दिशेने कृतीशील पावले उचलण्यासाठी पाठिंबा देतील. वंचित समुदायांमधील उद्योजकांसाठी सहाय्यक अध्ययन वातावरण निर्माण करणे. सहभागींना त्यांचे व्यवसाय विस्तारित करण्यास मदत करण्यासाठी संसाधने व मेन्टोरशीप देणे. सहभागींची आर्थिक साक्षरता, व्यवसाय क्षमता व कार्यरत कार्यक्षमता वाढवणे. समुदाय सहभाग आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक आर्थिक स्थिरतेला चालना देणे. हे ‘सशक्त’ उपक्रमाचे उद्देश आहेत.
‘’समुदाय-केंद्रित संस्था म्हणून एसपीजेआयएमआरचा व्यक्तींचा जीवनात प्रगती व परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षणाच्या क्षमतेवर विश्वास आहे,’’ असे एसपीजेआयएमआरचे डीन प्रो. वरूण नागराज म्हणाले आहे की, ‘’सशक्तसह आम्ही स्थानिक उद्योजकांना त्यांचे व्यवसाय विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्यांसह सुसज्ज करत आहोत, तसेच त्यांच्या समुदायांमध्ये अर्थपूर्ण योगदान करण्यास सक्षम करत आहोत.’’
‘’दरवर्षी, सीएफबीई अत्याधुनिक व्यावसायिक शिक्षण व व्यावहारिक मेन्टोरशीपचे मिश्रण असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतभरातील शेकडो उद्योजक आणि कौटुंबिक व्यवसाय प्रमुखांना सक्षम करते. सशक्त आमच्या मिशनला तळागाळापर्यंत घेऊन जातो, स्थानिक व्यवसाय मालकांना त्यांच्या समुदायांमध्ये शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेली कोशल्ये व पाठिंब्यासह सुसज्ज करतो,’’ असे एसपीजेआयएमआर येथील सीएफबीईच्या कार्यकारी संचालक आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन फॅमिली मॅनेज्ड बिझनेसच्या अध्यक्ष प्रो. तुलसी जयकुमार म्हणाल्या आहे.