नववर्षात टाटा समुह मेगा आयपीओ आणण्याच्या तयारीत; भरघोस कमाईसाठी पैसे तयार ठेवा!
तुम्हांला शेअर बाजारात दर्जेदार शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये चांगली संधी आहे. टाटा समूहाचे अनेक शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या खाली 34 टक्क्यांपर्यंतच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारातील घसरणीमुळे टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर, टाटा स्टील, टाटा केमिकल आणि इतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठी घट झाली आहे. त्यामुळे हे शेअर्स चांगल्या मूल्यांकनात उपलब्ध आहेत. या शेअर्सची सध्याची किंमत काय आणि ते त्यांच्या उच्चांकावरून किती टक्क्यांनी घसरले आहेत. याबाबत आज आपण जाणून घेँणार आहोत…
हे आहेत टाटाचे पाच शेअर्स
१. टाटा मोटर्स – देशातील आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांच्या 1179 रुपयांच्या उच्च पातळीवरून 774 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली घसरले आहेत. अर्थात या शेअरची 34 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
२. टाटा ॲलेक्सी – टाटा समूहाचा हा शेअर 9080 रुपयांच्या उच्चांकावरून 6374 रुपयांच्या पातळीवर घसरला आहे. या शेअरमध्ये जवळपास 32 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
हे देखील वाचा – स्टेट बँक ऑफ इंडिया साजरा करतेय प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेचा शतकोत्तर वारसा!
३. टाटा कंझ्युमर – एफएमसीजी क्षेत्रातील या टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून 26 टक्क्यांनी घसरले आहेत. टाटा कंझ्युमरच्या शेअर्सने 1247 रुपयांचा उच्चांक गाठला होता. पण आता त्याची किंमत 925 रुपये आहे.
४. टाटा केमिकल – टाटा समूहाची ही कंपनी रासायनिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. टाटा केमिकलचे शेअर्सही त्यांच्या उच्चांकावरून 22 टक्क्यांनी घसरले आहेत. हा शेअर 1247 रुपयांच्या उच्च पातळीवरून घसरला आहे आणि आता 1058 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
५. टाटा स्टील – भारतातील पोलाद क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलचे शेअर्सही घसरणीनंतर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. टाटा स्टीलचे शेअर्स 170 रुपयांच्या पातळीवरून घसरले आहेत आणि आता ते 138 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
काय करते ही कंपनी?
टाटा उद्योग समूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८० हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)