मार्चमध्ये १२ दिवस राहणार शेअर बाजार बंद, काय आहे कारण? सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Stock Market Holidays Marathi News: भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ट्रेडिंगचे तास आणि सुट्टीचे वेळापत्रक समजून घेणे आवश्यक असते. मार्च मध्ये असणाऱ्या सुट्ट्यांची माहिती घेऊन योग्य नियोजन करून, गुंतवणूकदार त्यांच्या ट्रेडिंग व्यवहाराचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकतात आणि त्यांचे गुंतवणूक पोर्टफोलिओ प्रभावीपणे ऑप्टिमाइझ करू शकतात.
एनएसई आणि बीएसईने २०२५ मध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. भारतीय शेअर बाजारात यावर्षी एकूण १४ ट्रेडिंग सुट्ट्या आहेत. फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक सुट्टी असते. मार्च आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन सुट्ट्या आणि एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये तीन सुट्ट्या असतील. या सुट्ट्या महत्त्वाच्या सण आणि प्रसंगी पाळल्या जातात, ज्या दरम्यान शेअर बाजारातील व्यापार बंद राहतो.
मार्च २०२५ मध्ये एकूण १२ दिवस कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी, होळी आणि ईद उल फित्र या सणांमुळे मार्च मध्ये तब्बल १२ दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. मार्च मधील शनिवार आणि रविवार च्या साप्ताहिक सुट्टीमुळे शेअर बाजार २, ३, ८, ९, १५, १६, २२, २३, २९ आणि ३० तारखेला बंद असेल. होळीनिमित्त 14 मार्च रोजी शेअर बाजार बंद राहील, तर 31 मार्च 2025 रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणानिमित्त सुट्टी असेल. होळी शुक्रवार, 14 मार्च रोजी आहे. यानंतर शनिवार 15 मार्च आणि रविवार 16 मार्च या तारखेला साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग तीन दिवस बाजारात व्यवहार होणार नाहीत. तसेच 29 ते 31 मार्चपर्यंत शेअर बाजार बंद राहणार आहे. 29 मार्चला शनिवार आणि 30 मार्चला रविवार आहे आणि 31 मार्चला ईद-उल-फित्रची सुट्टी आहे.
२६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) महाशिवरात्री
१४ मार्च २०२५ (शुक्रवार) होळी
३१ मार्च २०२५ (सोमवार) ईद-उल-फित्र (रमजान ईद)
१० एप्रिल २०२५ (गुरुवार) श्री महावीर जयंती
१४ एप्रिल २०२५ (सोमवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१८ एप्रिल २०२५ (शुक्रवार) गुड फ्रायडे
१ मे २०२५ (गुरुवार) महाराष्ट्र दिन
१५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) स्वातंत्र्यदिन
२७ ऑगस्ट २०२५ (बुधवार) गणेश चतुर्थी
२ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) महात्मा गांधी जयंती, दसरा
२१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) दिवाळी, लक्ष्मीपूजन
२२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) दिवाळी, बलिप्रतिपदा
५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) श्री गुरु नानक देव यांच्या प्रकाश गुरुपौर्णिमेनिमित्त
२५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) नाताळ