वसई-विरार महानगरपालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी “सफाई मित्र” हे नवे ॲप लाँच करण्यात आले आहे. महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना शहरात कचरा दिसल्यास फोटो काढून ॲपवर अपलोड करता येणार असून 24 तासांत साफसफाई करणे ठेकेदारांना बंधनकारक असणार आहे. नियमांचे पालन न केल्यास ठेकेदाराला दररोज 10 हजारांचा दंड तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना १ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.