Iran-Israel War : भारतात बांधकाम क्षेत्रासह उद्योगांवरही होणार युद्धाचा परिणाम; नेमकं काय होणार? (File Photo : Construction)
नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. इंधन पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतावर विविध क्षेत्रात परिणाम होत आहेत. त्यात बांधकाम क्षेत्रासह उद्योगांवरही युद्धाचा परिणाम होणार आहे.
भारत स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक आखाती देशांतून येतो. याशिवाय वीज निर्मिती आणि उद्योगासाठी याच्या नैसर्गिक वायू (एजी) या मोठा भाग (कतार, सौदी अरेबिया) या देशांतून भारत आयात करतो. या संपामुळे या समुद्री मार्गाने येण्यास अडचणी आहेत. याशिवाय, सिमेंट उत्पादन आणि बांधकाम साहित्यासाठी भारत आशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारत त्याच्या एकूण चुनखडीच्या ६८.५ टक्के आयात या प्रदेशातून करतो. पुरवठ्यातील अडचणी निर्माण झाल्यास सिमेंटच्या किमती वाढू शकतात, याचा थेट परिणाम भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर होऊ शकतो.
भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे लोखंडाची मोठी मागणी आहे. स्टील उत्पादनासाठी सर्वांत महत्वाचा इनपुट असलेल्या डायरेक्ट रिड्यूस्ड आर्यनचा अर्ध्याहून अधिक भाग पश्चिम आशियातून आयात केला जातो. शिवाय, भारतीय स्टील प्लांट त्यांच्या ऊर्जेच्या गरजा आणि कार्बनीकरण कमी करण्यासाठी एलपीजी आणि एलएनजीवर अवलंबून असतात. उच्च किमतीत चढ-उतार आणि कमी झालेली उपलब्धता या क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान असणार आहे.
युरिया उत्पादनाला फटका बसणार
भारतात खतांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची मोठी गरज पश्चिम आशियातील देश भागवतात. भारतात आयात होणाऱ्या सल्फरपैकी ६५.८ टक्के भाग पश्चिम आशियातून येतो. तो सल्पयूरिक आम्ल आणि खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. युरिया उत्पादनासाठी देखील एलएनजीचा वापर केला जातो. जर एलएन आणि सल्फरचा पुरवठा एक महिन्यापेक्षा जास्त विस्कळीत झाला तर भारताच्या देशांतर्गत युरिया उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
हेदेखील वाचा : THAAD Defence : युद्धात इराणला पहिलं यश! इराणच्या धाकाने दक्षिण कोरियाचं ‘कवच’ हिसकावलं; किम जोंग-उनला मोठी संधी






