Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा

IPO Listing Today: शेअर बाजारातील IPOच्या हंगामात 'या' कंपनीच्या IPOने दमदार सुरुवात केली. ₹82 इश्यू प्राइस असलेला शेअर 3 सप्टेंबर रोजी BSE वर ₹109 आणि NSE वर ₹110 वर लिस्ट झाला. त्यामुळे IPOमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशीच सुमारे 34% पर्यंत फायदा झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 03, 2026 | 01:14 PM
IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Power sector IPO News: शेअर बाजारात सध्या IPO चा सिझन जोरात सुरू आहे. अशातच एका कंपनीने लिस्ट होताच सगळ्यांना खुश करून टाकलं आहे. वीजेच्या तारा आणि केबल बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना चांगला पैसा कमावून दिला आहे.

किती रुपयांवर लिस्ट झाला शेअर?

लुमिनो इंडस्ट्रीजचा IPO ची किंमत ८२ रुपये ठेवली होती. ३ सप्टेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट झाला आणि लिस्ट होताच त्याने उडी मारली. BSE वर हा शेअर १०९ रुपयांवर लिस्ट झाला तर NSE वर ११० रुपयांवर झाला आहे. म्हणजे ज्या लोकांनी IPO मध्ये पैसे लावले होते त्यांना एकाच दिवसात ३४ टक्के नफा मिळाला आहे.

IPO ला तुफान प्रतिसाद

७०० कोटी रुपयांचा हा IPO थेट १२४ पट जास्त भरला गेला होता. एका शेअरसाठी १२४ लोक भांडत होते.यात मोठ्या कंपन्यांनी म्हणजे QIB लोकांनी २३२ पट जास्त बोली लावली होती. मोठ्या गुंतवणूकदारांनी म्हणजे NII लोकांनी १८५ पट आणि छोट्या म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांनी ४० पट जास्त पैसे लावले होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी जो भाग होता तो पण १२ पट भरला गेला होता. IPO येण्याआधीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २०७ कोटी रुपये उभे केले होते. IPO Listing Today:

नेमकी कंपनी आहे तरी कसली?

लुमिनो इंडस्ट्रीज करते काय? तर ही कंपनी वीज पारेषण आणि वितरण म्हणजे Transmission आणि Distribution क्षेत्रात काम करते.सोप्या भाषेत सांगायचं तर वीजेच्या मोठमोठ्या टॉवरवर ज्या तारा असतात, घरात जी वायरिंग असते, पॉवर केबल असतात ते सगळं ही कंपनी बनवते. एवढंच नाही तर ही एक EPC कंपनी पण करते, म्हणजेच Engineering, Procurement and Construction. ती मोठ्या कंपन्यांना आपलं सामान पुरवते आणि बाहेरच्या देशात पण माल विकते.

कंपनी खास HTLS कंडक्टर बनवते. हे असे कंडक्टर आहेत जे जास्त तापमान सहन करतात आणि जास्त झुकत नाहीत. सध्या याला खूप मागणी आहे. याचबरोबर कंपनी रेल्वेचं विद्युतीकरण, मोठे सबस्टेशन बांधणे, सोलर प्रोजेक्ट आणि पाणी व्यवस्थापनाचे प्रोजेक्ट पण करते.

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री

पैशाचा वापर कुठे करणार?

IPO मधून जो पैसा आला, त्याचा उपयोग कंपनी कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. कंपनीवर सध्या ३८४ कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामधला मोठा भाग फेडला जाईल. उरलेला पैसा कंपनी आपल्या कारखान्यासाठी नवीन मशीन विकत घेण्यासाठी, बांधकामासाठी आणि इतर कामांसाठी वापरणार आहे.

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करा; Step-Up SIPचं हे गणित समजून घ्या!

कंपनीचा नफा कसा आहे?

२०२५-२६ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ७ टक्क्यांनी वाढून २०८९ कोटी रुपये झाला आहे. आधी तो १९४६ कोटी होता. आणि निव्वळ नफा तर २८ टक्क्यांनी वाढला आहे. नफा १२४ कोटींवरून थेट १६० कोटींवर गेला आहे. त्यामुळेच लोकांनी या IPO वर एवढा विश्वास दाखवला.सध्या बाजारात चांगल्या कंपन्यांना चांगली किंमत मिळत आहे. लुमिनोने पण पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची निराशा केली नाही.

 

Web Title: Strong ipo debut power sector company delivers bumper returns to investors on listing day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Business News
  • IPO News
  • Marathi News

संबंधित बातम्या

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री
1

VI new Logo: Vodafone Ideaचा ‘किंग’ प्लॅन! ‘हा’ अभिनेता नवा ब्रँड अॅम्बेसेडर, नव्या लोगोचीही दमदार एन्ट्री

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करा; Step-Up SIPचं हे गणित समजून घ्या!
2

दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल करा; Step-Up SIPचं हे गणित समजून घ्या!

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले
3

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
4

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.