Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Price Drop : अरे वाह… साखरेच्या दराबाबत आली मोठी बातमी! दसरा-दिवाळीत भाव आणखी उतरणार?

Sugar Price Drop : सणासुदीचा काळ सुरू होत असताना महागाईच्या झटक्यानंतर आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचे एक्स-मिल भाव तब्बल २० टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे आता साखरेचे भाव कोसळणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 04, 2026 | 02:15 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साखरेच्या दराबाबत आली मोठी बातमी!
  • दसरा-दिवाळीत भाव आणखी उतरणार?
  • बाजारात नेमकी काय परिस्थिती?
Sugar Price Drop : सणासुदीच्या काळात सर्वसमान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. स्वयंपाक घरातील रोजच्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती बऱ्याच कडाडल्या आहेत. त्यात साखरेने बराच भाव खाल्ला आहे. साखरेचा गोडवा अचानक गायब झाला होता पण त्यात आता पुन्हा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचे एक्स मिल भाव 20 टक्क्यांनी घसरले आहेत. बाजारातील या घसरणीमुळे येत्या दसरा आणि दिवळीच्या काळात बाजारात साखरेचे भाव आणखी स्वस्त होणार असल्याची बातमी समोर आली आहे. या घसरणीमागे नेमकं कारण काय आणि किती दर उतरणार आहेत सविस्तर जाणून घेऊयात. ( Sugar Price Drop ) 

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

गणेश चतुर्दशी, नवरात्री, दसरा, दिवाळी आणि छठ यांसारख्या आगामी सणांमुळे साखरेच्या दरात आणखी घट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ‘X’ वर पोस्ट करून साखरेबाबत माहिती दिली आहे. ‘X’ वर केलेल्या पोस्टनुसार, देशातील किरकोळ बाजारात साखरेची किंमत सुमारे ५ टक्क्यांनी कमी झाली आहे. यापूर्वी साखरेच्या एक्स-मिल दरात सुमारे २० टक्क्यांची मोठी घसरण झाली असल्याची माहिती दिली आहे.

बाजारातील आकडेवारीनुसार काय परिस्थिती?

साखरेच्या बाजरातील आकडेवारीनुसार, गुरुवारी संध्याकाळी आलेल्या दरांनुसार साखरेचे भाव ६१ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. ३ सप्टेंबर रोजी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि रांचीमध्ये साखर ६१ रुपये प्रति किलो दराने विकली गेली होती. गुवाहाटी, कानपूर आणि रायपूरमध्ये ती ६२ रुपये प्रति किलो, तर चेन्नईमध्ये ६३ रुपये प्रति किलो इतका दर होता.

सामान्यांपर्यंत साखरेचे दर कधी कमी होणार?

सरकारच्या म्हणण्यानुसार, एक्स-मिलमधील घसरलेल्या दरांचा परिणाम किरकोळ बाजारात हळूहळू दिसू लागला आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या मते, गिरणीतील घसरलेल्या दरांचा परिणाम किरकोळ बाजारापर्यंत पोहोचायला काही वेळ लागतो, त्यामुळे त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकतो. त्यामुळे साखरेचे सध्याचे उतरलेले भाव हे सुरुवात असल्याचं मानलं जाऊ शकतं. जर कारखान्यातील साखरेचे दर कमी होत राहिले तर घाऊक बाजारानंतरही किरकोळ साखरेचे दरही उतरणार असल्याची शक्यता आहे.

ऑगस्टमधील दरवाढीनंतर सरकार अलर्ट मोडवर

ऑगस्टमध्ये साखरेच्या दरात अचानक कडाडून वाढ झाली होती. यानंतर सरकारने साखर बाजारावरील आपला लक्ष्य वाढवला. साठेबाजी आणि सट्टेबाजी यांसारख्या कारवायांना आळा घालण्यासाठी साखरेचा साठा, विक्री आणि बाजारभावावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले विविध नियम आणण्यात आले त्यामुळे कारवाया करुन आळा घालण्यास मदत झाली.
बाजारात साखरेची पुरेशी उपलब्धता आणि पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं.

ताजे आकडे ग्राहकांना दिलासा देणारे

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता, पद्धतशीर पुरवठा आणि किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने म्हटले आहे. सध्या सरकारचे ताजे आकडे ग्राहकांना दिलासा देणारे आहेत. ऑगस्ट महिन्यातील वाढीनंतर आता साखरेचे दर घसरण्याचा कल असून, त्याचा फायदा हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागला आहे.

दणका… 50000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, Auto Industry मध्ये मोठी खळबळ! प्लांटही होणार बंद; नेमके कारण काय?

Web Title: Sugar ex mill prices drop by 20 percent dussehra diwali price outlook marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Sugar Factory
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल
1

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

Sugar Price Drop : साखरेचे भाव कोसळले! तब्बल 30 टक्क्यांनी झाली स्वस्त, ‘इतक्या’ दिवसांनी ग्राहकांना मिळणार फायदा
2

Sugar Price Drop : साखरेचे भाव कोसळले! तब्बल 30 टक्क्यांनी झाली स्वस्त, ‘इतक्या’ दिवसांनी ग्राहकांना मिळणार फायदा

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
3

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार
4

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.