
Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू
Suryoday Small Finance Bank: सूर्यदयो स्मॉल फायनान्स बँक (SSFB) भारतातील एक अग्रगण्य न्यू-एज डिजिटल बँक असून आता बँकेने सुरक्षित कर्जवाढीच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून ‘गोल्ड लोन’ विभागात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. या सेवेची सुरुवात महाराष्ट्रातून करण्यात आली असून, येत्या काही महिन्यांत इतर राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. गोल्ड लोन बाजारात प्रवेश करणे हे सूर्यदयो स्मॉल फायनान्स बँकेच्या विविध, पूर्ण-सेवा रिटेल बँक म्हणून होत असलेल्या सातत्यपूर्ण परिवर्तनाचे द्योतक आहे. ज्यामध्ये संतुलित आणि सुरक्षित मालमत्ता मिश्रणावर भर देण्यात आला आहे.
हा निर्णय बँकेच्या अधिक सुरक्षित, तारण-आधारित आणि सूक्ष्म कर्ज पोर्टफोलिओ उभारण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे, ज्यामुळे विद्यमान तसेच नव्या ग्राहकांच्या बदलत्या कर्ज गरजा पूर्ण करता येतील. गोल्ड लोनमध्ये प्रवेश हा बँकेच्या प्रवासातील एक स्वाभाविक आणि धोरणात्मक टप्पा आहे. गेल्या अनेक वर्षांत SSFB ने अनसिक्योर्ड व्यवसाय कर्जामध्ये मजबूत पाया घातला आहे, विशेषतः महिला उद्योजकांना पाठबळ देत त्यांना व्यवसाय सुरू करण्यास, वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत केली आहे. या व्यवसायांच्या वाढी सोबतच त्यांच्या कार्यभांडवलाच्या गरजाही वाढल्या आहेत. अनेक दीर्घकालीन ग्राहकांनी बँकेकडे विश्वासार्ह आणि पारदर्शक गोल्ड लोन सोल्यूशनची मागणी केली होती. ग्राहकांची मागणी, नातेसंबंधांवर आधारित बँकिंग आणि स्थानिक उद्योजक परिसंस्थेची सखोल समज यामुळे हा टप्पा एक नैसर्गिक पुढाकार ठरतो.
15 पेक्षा अधिक राज्यांमध्ये 700 हून अधिक बँकिंग आउटलेट्सच्या उपस्थितीसह, SSFB आपल्या वितरण क्षमतेचा, ग्राहक संबंधांचा आणि डिजिटल अंडररायटिंग क्षमतेचा उपयोग करून गोल्ड लोन व्यवसायाचा नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्चबाबत प्रतिक्रिया देताना, सूर्यदयो स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी व सीईओ, बास्कर बाबू रामचंद्रन म्हणाले, “गोल्ड लोनची सुरुवात हा आमच्या धोरणात्मक परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे आम्हाला सुरक्षित, स्थिर आणि मागणीवर आधारित उत्पादनाद्वारे आमची मालमत्ता पुस्तिका सादर करता येईल. किरकोळ ग्राहकांची सखोल समज आणि आमची वाढती भौतिक व डिजिटल उपस्थिती आम्हाला गोल्ड लोन बाजारात प्रभावीपणे सेवा देण्यासाठी सक्षम करते. महाराष्ट्रातून सुरुवात करून, आम्ही ही सेवा वेगाने राष्ट्रीय स्तरावर विस्तारू, ज्यामुळे सर्वसमावेशक आर्थिक उपाय देण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ होईल. स्थिर मालमत्ता गुणवत्ता, अंदाजयोग्य परतावे आणि घरगुती सोन्याच्या मोनेटायझेशनमध्ये वाढ यामुळे गोल्ड-आधारित कर्जामध्ये दीर्घकालीन मजबूत संधी असल्याचे बँकेला वाटते.”
SSFB चे गोल्ड लोन उत्पादन 30 लाखांपर्यंतच्या कर्ज रकमेच्या मर्यादेत लवचिक आणि ग्राहक-केंद्रित वित्तपुरवठा देते, ज्यामध्ये त्वरित वितरण, पारदर्शक प्रक्रिया आणि सोयीचा समावेश आहे. मुख्य ग्राहक लाभांमध्ये शून्य प्री-क्लोजर शुल्क, लवचिक परतफेड पर्याय, मासिक व्याज भरणा व बुलेट प्रिन्सिपल परतफेड किंवा कालावधीच्या शेवटी प्रिन्सिपल आणि व्याज दोन्हींची बुलेट परतफेड, 12 महिन्यांचा मानक कालावधी आणि यशस्वी परतफेडीनंतर त्याच गहाण ठेवलेल्या सोन्यावर कर्ज नूतनीकरणाची सुविधा समाविष्ट आहे. गोल्ड लोनमधील हा विस्तार SSFB च्या मजबूत आणि विविध बॅलन्स शीट उभारण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. भारतातील गोल्ड लोन बाजार मोठा, कमी प्रवेश असलेला आणि स्थिर वाढ दर्शवणारा असून, स्केलेबल आणि सुरक्षित कर्जासाठी उत्तम संधी प्रदान करतो.