99 स्टोअरचा स्विगी फूड ॲपमध्ये एक स्वतंत्र विभाग आहे, जिथे सहभागी ब्रँड्सकडून रोजच्या खाण्यासाठी निवडक आणि परवडणारे खाद्यपदार्थ 49 रूपये, 79 रूपये आणि 99 रूपये या किमतीत दाखवले जातात आणि 49 रूपयांवरील ऑर्डर्सवर फ्री डिलिव्हरी मिळते. विश्वासू ब्रँड्सकडून उत्तम दर्जाचे जेवण आणि खाद्यपदार्थ परवडणाऱ्या किमतीत शोधणाऱ्या, पैशांचे मूल्य जपणाऱ्या ग्राहकांची ही सेवा गरज भागवते. गेल्या एका वर्षात, हे आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या पर्यायांसाठीही एक पसंतीचे प्लॅटफॉर्म म्हणून समोर आले आहे. 99 स्टोअर केवळ ऑर्डर्सची संख्या वाढवत नसून, नवीन शहरांमध्ये पोहोचणे, नवीन रेस्टॉरंट पार्टनर्सना जोडणे, स्विगीवर नवीन ग्राहक आणणे आणि ग्राहकांना कायम जोडून ठेवणे – हे सर्व एकाच मूल्यावर करत आहे. येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असले, तरी 99 स्टोअरवर बाऊल्स आणि थाळी, साऊथ इंडियन नाश्ता, बर्गर आणि अमेरिकन फूड, पिझ्झा, पेये, चाट आणि इतर स्नॅक्स हे सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत.
भारतातील टायर-1, 2 आणि 3 शहरांमधील ग्राहक भारतातील सर्वात मोठ्या QSR साखळ्यांपासून ते अगदी स्थानिक, शहरापुरत्या प्रसिद्ध असलेल्या ब्रँड्सपर्यंत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमधून निवड करू शकतात. ग्राहक बर्गर किंग, मॅकडोनाल्ड्स, KFC, डोमिनोज पिझ्झा आणि टॅको बेल यांसारख्या विश्वासू आणि लोकप्रिय ब्रँड्सकडून ऑर्डर करू शकतात. याशिवाय, देशातील काही अत्यंत लोकप्रिय स्थानिक ब्रँड्स हे 99 स्टोअरमध्ये सर्वात जास्त सक्रिय सहभागी आहेत – जे या किफायतशीर डिलिव्हरी फॉरमॅटला प्रादेशिक ओळख आणि स्थानिक ग्राहकांचे मोठे प्रेम मिळवून देत आहेत.
99 स्टोअरच्या यशाबद्दल बोलताना, स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य व्यावसायिक अधिकारी, सिद्धार्थ भाकू म्हणाले, “भारतातील मोठ्या, मध्यम आणि लहान शहरांमध्ये विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत, परवडणारे आणि उत्तम दर्जाचे जेवण शोधणाऱ्या, पैशांचे मूल्य जपणाऱ्या ग्राहकांचा एक मोठा वर्ग आहे. 99 स्टोअर खास याच परवडणाऱ्या पर्यायांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी तयार केले गेले होते. यामुळे, पूर्वी फक्त काही विशेष प्रसंगीच ऑनलाईन जेवण मागवणारे ग्राहक आता नियमित ग्राहक बनण्यात यश आले आहे. गेल्या 1 वर्षातील प्रतिसाद अभूतपूर्व राहिला असून गेल्या 1 वर्षात मासिक ऑर्डर्समध्ये 2.4 पट वाढ झाली आहे. ग्राहकांच्या प्रेमाव्यतिरिक्त, हे आमच्या रेस्टॉरंट पार्टनर्ससाठीही एक फायदेशीर मॉडेल ठरले आहे, कारण यामुळे नवीन ग्राहक तर जोडले जात आहेतच, शिवाय जुने ग्राहकही कायम टिकून राहण्यास मदत होत आहे. भविष्याचा विचार करता, आमचे पार्टनर नेटवर्क वाढवण्यासाठी आणि आमच्या 99 स्टोअरच्या ग्राहकांसाठी आणखी विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
आयुष कपूर, मुख्य विपणन अधिकारी, द थियोब्रोमा यांनी 99 स्टोअरमधील अनुभव सांगताना म्हटले, “गेल्या 12 महिन्यांतील द थियोब्रोमाची 99 स्टोअरमधील वाटचाल ही सातत्याने आणि शांतपणे वाढणाऱ्या व्यवसायाचे उदाहरण आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत अधिक वेगाने वाढ झाली. उत्पादनांच्या विक्रीत 52 टक्के, तर ग्राहकसंख्येत तब्बल 59 टक्के वाढ झाली. प्रीमियम पॅटिसरी ब्रँड म्हणून मूल्याधारित स्वरूपात विस्तार करताना, ब्रँडच्या प्रतिमेला कोणताही धक्का न पोहोचता सातत्यपूर्ण आणि वेगाने होणारी वाढ हा आमच्यासाठी सकारात्मक संकेत आहे. 99 स्टोअरच्या माध्यमातून मुंबईत द थियोब्रोमाची पोहोच सातत्याने वाढत असून, प्रत्येक नव्या ग्राहकासोबत हा विस्तार अधिक वेग घेत आहे.”
पुढे बोलताना रितू सेठ, उपाध्यक्ष – अॅग्रिगेटर चॅनल, डॉमिनोज पिझ्झा म्हणाल्या, “डॉमिनोज पिझ्झाने नोव्हेंबर 2025 मध्ये 99 स्टोअरवर सेवा सुरू केली. त्यानंतरच्या गेल्या 9 महिन्यांत कंपनीने दमदार आणि वेगाने वाढ नोंदवली आहे. या कालावधीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत उत्पादनांच्या विक्रीत 71 टक्के वाढ झाली. ग्राहकसंख्येतही जवळपास तितकीच वाढ झाली. पहिल्या सहामाहीतील 71 हजारांहून अधिक युनिक ग्राहकांची संख्या दुसऱ्या सहामाहीत 1.21 लाखांहून अधिक झाली. मुंबईत 170 आउटलेट्ससह 99 स्टोअरवरील कोणत्याही ब्रँडच्या तुलनेत डॉमिनोजची डिलिव्हरी पोहोच सर्वाधिक व्यापक आहे. या व्यापक पोहोचचे रूपांतर आता मोठ्या प्रमाणातील विक्रीत होत आहे.”
99 स्टोअरमुळे रेस्टॉरंट पार्टनर्सना अशा ग्राहक वर्गाकडून अतिरिक्त ऑर्डर्स मिळत आहेत, ज्यांपर्यंत ते एरवी पोहोचू शकले नसते. तसेच, 99 स्टोअर हे परवडणारे पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक सवय निर्माण करणारे माध्यम ठरत आहे. आकडेवारीवरून हेच स्पष्ट दिसते की, प्लॅटफॉर्मवरील इतर ग्राहकांच्या तुलनेत 99 स्टोअरवर पहिली ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांचा टिकून राहण्याचा दर जास्त आहे आणि अधूनमधून ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांचे नियमित ग्राहकांमध्ये रुपांतर होत आहे. याशिवाय, 99 स्टोअरच्या स्वतंत्र विभागामुळे ते शोधणे सोपे झाले असून ग्राहकांचा सहभागही वाढला आहे.
8th Pay Commission वर सरकारचा मोठा खुलासा! वाढीव पगारासाठी अजून किती वाट पाहावी लागणार?



