फोटो सौजन्य - Social Media
गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या घसरणीची नोंद झाली. सेन्सेक्सने 5% तर निफ्टीने 4.5% पेक्षा जास्त नुकसान सहन केले. अशा घसरणात काही पेनी स्टॉक्सनी मात्र त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला. 5 असे काही पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांच्यामध्ये या काळात ५% वाढ दिसून आली आहे. मुळात, या स्टॉक्सचे बाजार मूल्य 1000 कोटी रुपयांपेक्षा कमी असून त्यांची किंमत 20 रुपयांच्या खाली आहे. या स्टॉक्सनी कसा परफॉर्म केला? चला तर मग पाहुयात.
फ्रँकलिन इंडस्ट्रीज
फ्रँकलिन इंडस्ट्रीजच्या शेअर्सना शुक्रवारी 5% अपर सर्किट लागले आणि शेअरची किंमत 3.15 रुपयांवर पोहोचली. ही मायक्रोकॅप कंपनी आहे, ज्याचे बाजार भांडवल 91.10 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात या स्टॉकने 43% वाढ नोंदवली आहे. अल्प किंमतीच्या स्टॉक्समध्ये हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरला आहे.
एलजीबी फोर्ज
एलजीबी फोर्ज लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जवळपास 10% घसरण झाली, तरीही या स्टॉकने एकूण 42% वाढ नोंदवली आहे. याची सध्याची बाजार किंमत 18.02 रुपये आहे. या स्टॉकचे बाजार भांडवल 429.24 कोटी रुपये आहे. मायक्रोकॅप आणि पेनी स्टॉक्समध्ये हा एक मजबूत कामगिरी करणारा शेअर मानला जातो.
एनबीई बिझनेस आणि फायनान्स
एनबीई बिझनेस आणि फायनान्सच्या शेअर्सनी गेल्या आठवड्यात 38% वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी या स्टॉकमध्ये 20% अपर सर्किट लागले आणि शेवटी हा स्टॉक 18.24 रुपयांवर बंद झाला. याचे बाजार भांडवल फक्त 26.13 कोटी रुपये आहे. कमी किमतीत मोठा नफा देणाऱ्या स्टॉक्समध्ये हा स्टॉक ठळक ठरतो.
संभव मीडिया
संभव मीडिया या कंपनीच्या शेअर्सनी शुक्रवारी 12% वाढ नोंदवली आणि शेअरची किंमत 8.95 रुपयांवर पोहोचली. मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या स्टॉकने 34% नफा दिला आहे. याचे बाजार भांडवल 168.35 कोटी रुपये आहे. कमी किंमतीच्या स्टॉक्समध्ये मजबूत कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये याचा समावेश होतो.
मेगा कॉर्पोरेशन
मेगा कॉर्पोरेशन या स्टॉकने गेल्या आठवड्यात 25% वाढ नोंदवली आहे. या स्टॉकची शेवटची बाजार किंमत 3.03 रुपये आहे. याचे बाजार मूल्य 60.60 कोटी रुपये आहे. अल्प किंमतीतून गुंतवणूकदारांना मोठा परतावा देणाऱ्या स्टॉक्समध्ये याचा उल्लेख होतो.
पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणुकीची जोखीम आणि फायदा
पेनी स्टॉक्स हे कमी किमतीचे असतात, त्यामुळे अल्प गुंतवणुकीतही मोठा नफा मिळवण्याची संधी असते. मात्र, यामध्ये जोखीमही जास्त असते. अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास करणे आणि विश्लेषकांचा सल्ला घेणे आवश्यक असते. गेल्या आठवड्यात बाजारात मोठी घसरण असतानाही या पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांसाठी चांगली कामगिरी केली आहे. अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम विचारात घेणे महत्त्वाचे आहे. कमी किंमतीच्या शेअर्समध्ये मोठा नफा मिळवण्याची क्षमता असते, मात्र त्यासाठी योग्य माहिती आणि अभ्यास महत्त्वाचा आहे.