Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transrail Lighting: ट्रान्‍सरेलची दमदार कामगिरी; नफा 28 टक्क्यांनी वाढून 421 कोटींवर

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ही पॉवर टी अँड डी (पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन) क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणारी आणि लॅटिस स्ट्रक्चर्स, कंडक्टर्स व मोनोपोल्ससाठी एकात्मिक उत्पादन सुविधा असणारी भारतातील अग्रगण्य ईपीसी कंपनी आहे. या कंपनीने आज चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२६ चे आपले निकाल जाहीर केले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 29, 2026 | 06:50 PM
(फोटो- सोशल मिडिया)

(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ही पॉवर टी अँड डी म्हणजेच पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन) क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणारी आणि लॅटिस स्ट्रक्चर्स, कंडक्टर्स व मोनोपोल्ससाठी एकात्मिक उत्पादन सुविधा असणारी भारतातील अग्रगण्य ईपीसी कंपनी आहे. या कंपनीने आज चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२६ चे आपले निकाल जाहीर केले.

सिद्धरामय्यांचा राजीनामा आणि शिवकुमार यांच्या एन्ट्रीने ‘हा’ शेअर सुसाट; एका दिवसात तब्बल 20% ची तेजी

संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६च्या कामगिरी

कंपनीच्या संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६च्या कामगिरीचा विचार केला तर, कार्यसंचालनांमधून मिळालेल्या महसुलात वार्षिक आधारावर ३० टक्क्यांची मजबूत वाढ झाली असून, हा महसूल आर्थिक वर्ष २०२५ मधील ५,३०८ कोटी रुपयांवरून वाढून ६,८८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीचा ईबीआयटीडीए देखील २१ टक्क्यांच्या वाढीसह ६७६ कोटी रुपयांवरून ८२० कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग करपूर्व नफा२५ टक्क्यांनी वाढून ५८४ कोटी रुपये नोंदवला गेला जो मागील वर्षी ४६७ कोटी रुपये होता आणि कर खर्च १८ टक्क्यांनी वाढून १६३ कोटी रुपये झाला. परिणामी, संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ साठी कंपनीचा ऑपरेटिंग करोत्तर नफा २८ टक्क्यांच्या उल्लेखनीय वाढीसह ४२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षात ३२९ कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचा ऑपरेटिंग करोत्तर नफा मार्जिन ६.१ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे.

ट्रान्सरेलचा सातत्यपूर्ण वाढीचा वेग

या निकालांबाबत मत व्‍यक्त करत एमडी आणि सीईओ श्री. रणदीप नारंग म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ मधील ही उत्कृष्ट कामगिरी बदलत्या व्यावसायिक वातावरणातही ट्रान्सरेलचा सातत्यपूर्ण वाढीचा वेग निदर्शनास आणते. आम्ही आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल, ईबीआयटीडीए आणि करोत्तर नफा  नोंदवला आहे. प्रमुख व्यावसायिक क्षेत्रे आणि विविध भौगोलिक बाजारपेठांमधील मजबूत अंमलबजावणीमुळे हे शक्य झाले आहे, यामुळे आम्हाला उद्योगात आघाडीचे नफा मार्जिन राखण्यात यश आले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट

याशिवाय, खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता वाढवून, कर्ज कमी करून आणि ८१७ कोटी रुपयांचा प्रबळ ऑपरेटिंग कॅश फ्लो निर्माण करून आम्ही आम्ही बॅलन्स शीट अधिक मजबूत करण्यात मोठी प्रगती केली आहे. हा कॅश फ्लो गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

या वर्षादरम्यान, आम्ही आमची टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे आणि बुटीबोरी येथे नवीन ग्रीनफिल्ड प्लांट सुरू केला आहे. तसेच कंडक्टर्ससाठी देखील अशीच क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उत्तम ऑर्डर बुक आणि विविध व्यवसाय व भौगोलिक क्षेत्रांमधील नवीन ऑर्डर्स मिळवण्याची प्रबळ क्षमता याच्या जोरावर ट्रान्सरेल मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी आपला वाढीचा आलेख कायम राखण्यास पूर्णपणे सज्ज आहे.

Supreme Court चा निकाल आणि क्रॅश झाला ‘हा’ शेअर, आज तब्बल 16 टक्क्यांनी गडगडले भाव!

Web Title: Transrail lighting limited fy26 net profit rallies to 421 crore marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • share market

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
1

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर ‘हे’ 8 शेअर्स
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर ‘हे’ 8 शेअर्स

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी
3

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
4

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.