Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gratuity New Rule : आता 5 वर्षांची अट संपली; 1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवा नियम

वीन लेबर कोडअंतर्गत, ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या तरतुदींनुसार, फिक्स्ड-टर्म कर्मचाऱ्यांना (FTEs) ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी यापुढे पाच वर्षे वाट पाहावी लागणार नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 03:10 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नवीन लेबर कोडअंतर्गत, ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल
  • ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार नाही
  • केवळ एक वर्षाची सर्विस पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटीसाठी पात्र
Gratuity New Rule : नवीन लेबर कोडअंतर्गत, ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या तरतुदींनुसार, फिक्स्ड-टर्म कर्मचाऱ्यांना (FTEs) ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी यापुढे पाच वर्षे वाट पाहावी लागणार नाही. या नियमांमधील बदलांमुळे, आता केवळ एक वर्षाची  सर्विस पूर्ण केल्यानंतरच  ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतील. नियमांमध्ये काय झालेत बदल?

‘ना पारसी, ना मुंबईकर’; Tata Trust मध्ये समोर आला नवा वाद! वेणु श्रीनिवासन यांचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

Fixed Term म्हणजे काय?

पूर्वी जेव्हा एखादी कंपनी कर्मचाऱ्याला कंत्राटी म्हणजेच contractual तत्त्वावर कामावर रुजू करून घेत होती तेव्हा त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखेच समान लाभ मिळत नव्हते. आता मात्र, Fixed-Term अंतर्गत, एका विशिष्ट कालावधीसाठी म्हणजेच साधारणपणे १ किंवा २ वर्षांसाठी लेखी करारावर नियुक्त केलेले कर्मचारी थेट कंपनीच्या payrollवर घेतलं जाणार आहे. याचा अर्थ असा की, त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान वेतन, रजेचे हक्क आणि इतर भत्ते मिळणार आहेत. प्रचलित कायद्यानुसार (Payment of Gratuity Act, 1972), एखादा कर्मचारी केवळ पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतो. पण ‘निश्चित कालावधी कर्मचारी’ म्हणजे FTE अंतर्गत, जर तुमचा कंपनीसोबतचा करार समजा १ वर्ष आणि ३ महिन्यांचा असेल, तर तुम्हाला संपूर्ण १५ महिन्यांसाठीची ग्रॅच्युइटी दिली जाईल. ही बातमी, विशेषतः project-based work मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

थोडक्यात सांगायचे तर, ‘निश्चित कालावधी कर्मचाऱ्यां’साठी (FTEs) किमान एक वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण करणं अनिवार्य आहे. जे कर्मचारी एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काम करतील, ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरणार नाहीत. एकदा का एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, की त्यानंतर काम केलेल्या प्रत्येक अतिरिक्त महिना किंवा दिवसासाठी कंपनी ग्रॅच्युइटीची गणना करून ती सेवा तुम्हाला देणार आहे.; उदाहरणार्थ, जर तुम्ही १ वर्ष आणि ५ महिने काम केले असेल, तर तुम्हाला १७ महिन्यांसाठीची ग्रॅच्युइटी मिळेल.

नियमांमध्ये बदल का?

नियमांमधील हे बदल अशा व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लागू करण्यात आले आहेत, जे छोटे-छोटे प्रोजेक्ट्स किंवा फिक्स्ड कॉन्ट्रॅक्टच्या करारांतर्गत म्हणजेच सामान्यतः १ किंवा २ वर्षांसाठी काम करतात. या बदलांचा मुख्य उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की, त्यांनाही त्यांच्या कामाबाबत ‘ग्रॅच्युइटी’ मिळावी; आणि त्यासाठी त्यांना पाच वर्षांच्या मोठ्या काळातून जावं लागू नये.

बेसिक सॅलरीमध्ये वाढ

नवीन Labor Codeनुसार, ग्रॅच्युइटीची कैलकुलेशन सैलरी बेस्डवर असेल. हे वेतन कर्मचाऱ्याच्या एकूण ‘CTC’ च्या किमान ५० टक्के असणे अनिवार्य आहे. नियमांनुसार, तुमच्या CTC मध्ये समाविष्ट असलेले HRA म्हणजेच घरभाडे भत्ता किंवा प्रवास भत्ता यांसारखे भत्ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाहीत. जर हे भत्ते ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत असतील, तर ती अतिरिक्त रक्कम तुमच्या Basic Salary मध्ये जोडली जाईल. यामुळे मूळ वेतनात वाढ होईल, परिणामी ग्रॅच्युइटी आणि PF मध्ये मिळणाऱ्या रकमांमध्येही वाढ होईल.

Full and Final Settlement’ला गती

सध्या, कंपन्यांना ‘Full and Final Settlement’ (F&F) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामान्यतः ३० ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्याचा राजीनामा, सेवा समाप्ती (Termination) किंवा कराराचा कालावधी संपल्यानंतर, कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी आणि वेतनाची थकीत रक्कम दोन कामकाजाच्या दिवसांच्या आत अदा करणे बंधनकारक असणार आहे.

Petrol Diesel Price Today : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती थेट गगनाला, पाहा तुमच्या शहरात नवीन दर काय?

Web Title: Under the new labour code certain employees will be entitled to claim gratuity even after just one year of service marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • new rules
  • payment

संबंधित बातम्या

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
1

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
2

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
3

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.