(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Petrol-Diesel Price : जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. परिणामी संपूर्ण जग महागाईच्या विळख्यात सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या म्हणजे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही होतो. त्यामुळे सगळ्यांसोबतच आता पेट्रोल – डिझेलच्या किमती कडाडत आहे. नेमकी किती वाढलेत दर ? तुमच्या शहरात किती असेल दर याबाबत सविस्तर समजून घेऊयात.
सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्वीच्याच पातळीवर ठेवले आहेत. पेट्रोल ९४ ते १०५-१०६ रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. डिझेलचे दरही ७८ ते ९७ रुपये प्रति लिटरच्या दरम्यान आहेत. सरकारी कंपन्यांनी इंधनाचे दर स्थिर ठेवले असताना, खासगी कंपन्यांनी मात्र दरवाढ केली आहे. Nayara Energy कंपनीच्या पाठोपाठ, Shell India कंपनीनेही इंधनाचे दर वाढवले आहेत.
जागतिक स्तरावर, कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेल या दोन्हीच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे खाजगी कंपन्या आपलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, १ एप्रिलपासून Shell India पेट्रोलच्या दरात ७.४१ रुपये आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांची मोठी वाढ केली आहे. परिणामी, खाजगी कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती साधारणपणे ११९ रुपये आणि १२३ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.
दिल्लीमध्ये पेट्रोल ₹९४.७७ तर डिझेल ₹८७.६७
मुंबईमध्ये पेट्रोल ₹१०३.५४ तर डिझेल ₹९०.०३
कोलकातामध्ये पेट्रोल ₹१०५.४५ तर डिझेल ₹९२.०२
बंगळुरूमध्ये पेट्रोल ₹१०२.९२ तर डिझेल ₹९०.९९
चेन्नईमध्ये पेट्रोल ₹१००.८० तर डिझेल ₹९२.३९
पाटणामध्ये पेट्रोल ₹१०५.१८ तर डिझेल ₹९२.०४
जयपूरमध्ये पेट्रोल ₹१०४.८८ तर डिझेल ₹९०.३६
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ₹८२.४६ तर डिझेल ₹७८.०५
तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल ₹१०७.४८ तर डिझेल ₹९६.४८
प्रीमियम पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी, ‘इंडियन ऑइल’ने XP100 च्या दरात प्रति लिटर ₹११ ची वाढ केली. या वाढीमुळे, या पेट्रोलचा दर थेट ₹१४९ वरून वाढून ₹१६० प्रति लिटरवर पोहोचला. त्याचप्रमाणे, प्रीमियम डिझेल प्रकार असलेल्या ‘ExtraGreen’चा दरही ₹९१.४९ वरून वाढून ₹९२.९९ प्रति लिटर इतका झाला आहे. सरकारी कंपन्यांनी दर वाढवले नसले तरीही खासगी कंपन्यांनी मात्र आपल्या दरांमध्ये बरीच वाढ केली आहे. जागतिक स्तरावरील परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत सरकारी मालकीच्या तेल कंपन्या कशा प्रकारे दर आटोक्यात ठेवतील हे पाहावं लागेल.






