
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO च्या शुभारंभाची तयारी जोरात सुरू आहे. औपचारिक मार्केटिंग प्रोसेस पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मार्केटमध्ये येताच हा IPO चांगलाच धुंवा उडवणार आहे. आम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE च्या आयपीओबद्दल बोलत आहोत, ज्याला आता एक मोठे अपडेट समोर येत आहे.
SBI खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! रिवॉर्ड पॉइंट्सबाबत मोठा नियम; त्वरित करा ‘हे’ काम
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, NSE पुढील आठवड्यात आपल्या इनीशियल पब्लिक ऑफरींगसाठी म्हणजे IPO साठी औपचारिक मार्केटींग सुरू करणार आहे. गेल्या महिन्यात, NSE ने आयपीओसाठी आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस DRHP मार्केट रेग्युलेटर सेबीकडे सादर केला होता.
अहवालात म्हटले आहे की, या इश्यूसाठी मार्केटिंग सुरू झाल्याने, भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओची शक्यता वाढेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चालवणाऱ्या संस्थेने सप्टेंबरमध्ये शेअर बाजारात पदार्पण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
NSE आपल्या आयपीओसाठी अमेरिका, लंडन, सिंगापूर, हाँगकाँग, मध्य पूर्व आणि भारतात गुंतवणूकदार बैठका आयोजित करण्याची योजना आखत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, एक्सचेंज मार्केटिंग योजनेसंदर्भात बँकांशी सतत चर्चा करत आहे. पण IPO चा आकार, मूल्यांकन किंवा वेळ बदलू शकतो.
ब्लूमबर्गच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतातील अग्रगण्य एक्सचेंज ३ अब्ज डॉलर्सपर्यंत निधी उभारण्याची योजना आखत आहे. पण एनएसईच्या प्रतिनिधींनी अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. दाखल केलेल्या माहितीनुसार, विद्यमान भागधारक १४८.९ दशलक्ष शेअर्स, म्हणजेच त्यांच्या हिश्श्याच्या अंदाजे ६%, विकण्याची तयारी करत आहेत.
अनलिस्टेडझोन या अनलिस्टेड स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मनुसार, ग्रे मार्केटमध्ये या एक्सचेंजचे मूल्यांकन ५.२५ लाख कोटी रुपये किंवा ५५.१ अब्ज डॉलर्स इतके आहे. या मूल्यांकनानुसार, देऊ केलेल्या संपूर्ण हिश्श्याच्या विक्रीतून अंदाजे ३०६ अब्ज रुपये उभारले जाऊ शकतात, जे २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या २७८.७ अब्ज रुपयांच्या लिस्टिंगला मागे टाकेल.