Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

जागतिक व्यापारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारत, चीन, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह जगातील ६० प्रमुख देशांवर १० ते १२.५ टक्क्यांपर्यंत नवीन आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. 'फोर्स्ड लेबर' नियमांची कठोर अंमलबजावणी न केल्याचे कारण देत अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 11:30 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका!
  • भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ
  • भारतीय उद्योगांवर होणार मोठा परिणाम?
US New Tariff Rules: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचं शस्त्र वापरलं आहे. त्यामुळे भारतासह इतर देशांना चांगलाच दणका बसणार आहे. नुकतीच त्यांनी आयात शुल्काबाबत मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने गुरुवारी Forced labor बद्दलच्या चिंतेमुळे 60 व्यापारी भागीदारांवर नवीन शुल्क जाहीर केले आहे. हे नवीन शुल्क, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लादलेल्या आणि आता मुदत संपत असलेल्या जागतिक शुल्कांची जागा घेतील. याचा भारतीय उद्योगांवर काय परिणाम होणार?

PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम

नवीन टॅरिफ कधीपासून होणार लागू?

अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेजेंटेटिव USTR द्वारे जाहीर केलेले हे नवीन शुल्क, शुक्रवारी पूर्व वेळेनुसार मध्यरात्री १२:०१ वाजल्यापासून लागू होतील. USTR च्या माहितीपत्रकानुसार, हे शुल्क १०% ते १२.५% पर्यंत असेल आणि त्यात अमेरिकेच्या अंदाजे ९९.४% व्यापाराचा समावेश असणार आहे. या टॅक्सचा मोठा दणका चीन, भारत आणि युरोपियन युनियनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांवर होणार आहे.

ते सगळे अमेरिकेच्या व्यापाराचा एक महत्त्वपूर्ण भाग

AFP च्या वृत्तानुसार, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेम्सन ग्रीअर यांनी स्पष्ट केलं की, “अमेरिकेने जवळपास एक शतकापासून सक्तीच्या मजुरीचा समावेश असलेल्या आयातीवर बंदी घातली आहे आणि तिची कठोरपणे अंमलबजावणी केली आहे; आता आपल्या व्यापारी भागीदारांनीही तेच करण्याची वेळ आली आहे.” अशा शब्दांत त्यांनी पुढील रणनीती स्पष्ट केली.
त्यांनी पुढे असेही सांगितले की, ज्या अर्थव्यवस्थांना लक्ष्य करण्यात आलं ते सगळेच अमेरिकेच्या व्यापाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.

 १० टक्के शुल्क पुन्हा लागू

फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे अनेक आयात शुल्क रद्द केल्यानंतर, ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ वॉल पुन्हा उभारण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. त्या न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या इच्छेनुसार मोठा टॅक्स लादण्याच्या क्षमतेला बराच धक्का बसला होता. त्या धक्क्यानंतर, ट्रम्प यांनी आयातीवर १० टक्के शुल्क पुन्हा लागू करण्यासाठी स्वतंत्र अधिकारांचा वापर केला. पण, ही तरतूद केवळ १५० दिवसांसाठी होती आणि शुक्रवारी ती संपुष्टात येत आहे.

नवीन शुल्कांची मालिका लागू

जूनमध्ये सुरुवातीला प्रस्तावित केलेल्या शुल्कांच्या जागी आता नवीन शुल्कांची मालिका लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता सगळ्या देशांवर त्याचा बराच दणका बसणार आहे. हे उपाय अनेक महिन्यांच्या छाननीनंतर विकसित केले गेले आहेत आणि ते पूर्वीच्या उपायांपेक्षा कायदेशीर आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतील असा विश्वास आहे.

कोणाला दिलासा आणि कोणाला अतिरिक्त शुल्क

अलीकडील घोषणेनुसार, ज्या अर्थव्यवस्थांनी सक्तीच्या मजुरीचा समावेश असलेल्या आयातीवर बंदी लागू केली आहे किंवा बंदी काढण्याचा शब्द दिला गेला आहे. त्यांच्यावर १० टक्के कमी दराने शुल्क आकारले जाईल. यामध्ये कॅनडा, युरोपियन युनियन, भारत आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांवर १२.५ टक्के जास्त टॅरिफ शुल्क लादण्यात आले. पण युरोपियन युनियन, तैवान, जपान, दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंड यांना काहीसा दिलासा मिळेल, कारण हे अमेरिकेसोबतच्या पूर्वीच्या व्यापार करारांशी सुसंगत आहे.

दरम्यान, ज्या वस्तूंवर आधीपासूनच क्षेत्र-विशिष्ट शुल्क आकारले जाते. जसे की पोलाद आणि ॲल्युमिनियम, त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. एका अमेरिकी अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, काही विशिष्ट ऊर्जा उत्पादने आणि खते यांनाही सूट दिली जाईल, तसेच अमेरिका-मेक्सिको-कॅनडा मुक्त व्यापार करारांतर्गत येणाऱ्या वस्तूंनाही सूट मिळेल.

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Us imposes new 10 percent tariff on india china 60 countries impact explained business marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • America
  • Business News
  • Donald Trump
  • Marathi News
  • New tax slabs
  • Tarrif

संबंधित बातम्या

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर
1

नोकरीच्या जगात AI ची वाढती एंट्री! भरतीपासून कामगिरीच्या आढाव्यापर्यंत आता सगळीकडे AIचा वापर

US Saudi Deal: इराणला रोखण्यासाठी अमेरिकेची सौदीच्या खांद्यावर बंदूक; युरेनियम संवर्धन सूट आणि ‘हा’ करार ठरणार गेमचेंजर
2

US Saudi Deal: इराणला रोखण्यासाठी अमेरिकेची सौदीच्या खांद्यावर बंदूक; युरेनियम संवर्धन सूट आणि ‘हा’ करार ठरणार गेमचेंजर

Student Protest : विद्यार्थ्यांचा आंदोलनात दिसला ‘अमेरिका क्या कहता था’ फेम Viral मुलगा! नेटकरी झाले हैराण, म्हणाले ‘तू इथे कसा?’
3

Student Protest : विद्यार्थ्यांचा आंदोलनात दिसला ‘अमेरिका क्या कहता था’ फेम Viral मुलगा! नेटकरी झाले हैराण, म्हणाले ‘तू इथे कसा?’

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
4

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.