Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
गुरुवारी, भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ३६३.६६ अंकांनी, म्हणजेच ०.४७ टक्क्यांनी घसरून ७६,३९१.३९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२६.६५ अंकांनी, म्हणजेच ०.५३ टक्क्यांनी घसरून २३,८६९.६० वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक गुरुवारी ५३४.८० अंकांनी, म्हणजेच ०.९४% ने घसरून ५६,५९२.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये मॅन इंडस्ट्रीज (इंडिया), एस्टर इंडस्ट्रीज आणि ओरिएंट इलेक्ट्रिक या तीन स्टॉक्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार एनटीपीसी, श्रीराम फायनान्स, हिंदुस्तान झिंक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, केफिन टेक्नॉलॉजीज, इंडिगो, इन्फोसिस, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, सायंट, शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज, मीशो या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी काबरा एक्सट्रूजन टेक्निक, आस्क ऑटोमोटिव्ह, प्रिकॉल, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि मनाली पेट्रोकेमिकल्स या शेअर्सची निवड केली आहे.
PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम
आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये शैलि इंजिनिअरिंग प्लास्टिक्स लि., रेन इंडस्ट्रीज लि., डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि., एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., कोटक महिंद्रा बँक लि., बजाज कंझ्युमर केअर लि. आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. या स्टॉक्सचा समावेश आहे.






