Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!

वित्तीय पायाभूत सुविधा आणि डिजिटल लेंडिंग क्षेत्रातील अग्रणी 'व्हर्टिस प्लॅटफॉर्म्स'ने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कंपनीचा करानंतरचा नफा १८०% पेक्षा जास्त वाढून ₹९६.२२ कोटींवर पोहोचला आहे, तर एकूण महसूल ५५% वाढीसह ₹३६६.५८ कोटी नोंदवला गेला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 03:19 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सने FY26 मध्ये ₹96.22 कोटींचा PAT नोंदवला
  • महसूल वाढून ₹366.58 कोटींवर
  • EBITDA दुपटीहून अधिक वाढून ₹124.9 कोटींवर
Vertis Platforms Q4 FY26 Results: रिटेल क्रेडिट पार्टिसिपेशन, डिजिटल कर्जवितरण (Digital Lending) आणि लेंडिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वित्तीय पायाभूत सुविधा (Financial Infrastructure) कंपनी व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी आपले लेखापरीक्षित (Audited) एकत्रित (Consolidated) आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनी लेंडेनक्लब, इंस्टामनी आणि व्हर्टिस वन या तीन प्रमुख प्लॅटफॉर्म्सचे संचालन करते.

ITR Rules: कमी इनकम असलेल्यांनाही बसणार दंड? वर्षाला 4 लाख कमाईवालेही ‘या’ लिस्टमध्ये, नेमका नियम काय?

₹96.22 कोटींचा करानंतरचा नफा

समूहाने आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹96.22 कोटींचा करानंतरचा नफा (Profit After Tax – PAT) नोंदवला असून, FY25 मधील ₹34 कोटींच्या तुलनेत ही 180% पेक्षा अधिक वाढ आहे. एकत्रित महसूल (Consolidated Revenue) 55% वाढून ₹366.58 कोटींवर पोहोचला, तर EBITDA मागील आर्थिक वर्षातील ₹50 कोटींवरून वाढून ₹124.9 कोटींवर गेला, म्हणजेच दुपटीहून अधिक वाढ झाली. FY26 दरम्यान व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सच्या विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे ₹5,000 कोटींपेक्षा अधिक मूल्याचे व्यवहार (Transaction Value) पूर्ण करण्यात आले.

गुंतवणूकदारांना क्रेडिट गुंतवणुकीच्या संधी

ही कामगिरी कंपनीच्या लाभदायक वाढीची (Profitable Growth), कार्यक्षम संचालनाची (Operational Discipline) आणि विविध प्लॅटफॉर्म व्यवसायांद्वारे विस्तारक्षम (Scalable) क्रेडिट पायाभूत सुविधा उभारण्याच्या धोरणाची साक्ष देते. समूहाच्या पीअर-टू-पीअर (P2P) कर्जवितरण प्लॅटफॉर्म लेंडेनक्लब, ज्याचे संचालन इन्नोफिन सोल्यूशन्स प्रा. लि. करते, याने समूहाच्या एकूण महसुलात 54% योगदान दिले आणि गुंतवणूकदारांना क्रेडिट गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू ठेवले.

प्लॅटफॉर्म इंस्टामनीकडून महसुलात 43% योगदान

कंपनीचा लोन सर्व्हिस प्रोव्हायडर (Loan Service Provider – LSP) प्लॅटफॉर्म इंस्टामनीने एकूण महसुलात 43% योगदान दिले. या प्लॅटफॉर्मने संस्थात्मक कर्जदात्यांसोबत (Institutional Lenders) भागीदारी वाढवत डिजिटल कर्ज स्रोत (Sourcing), कर्ज मंजुरी (Origination) आणि सेवा (Servicing) अधिक बळकट केली. तर कंपनीचा टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर (Technology Service Provider – TSP) व्यवसाय व्हर्टिस वनने एकूण महसुलात 2% योगदान दिले. उर्वरित 1% महसूल समूहातील इतर कंपन्यांकडून प्राप्त झाला. या कंपन्यांनी वित्तीय संस्थांसाठी डिजिटल कर्जवितरण पायाभूत सुविधा आणि प्लॅटफॉर्म सोल्यूशन्स उपलब्ध करून देत कंपनीच्या तांत्रिक क्षमतांना अधिक बळकटी दिली.

AI आधारित उत्पादनांच्या विकासावर विशेष भर

आर्थिक वर्षादरम्यान समूहाने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित उत्पादनांच्या विकासावर विशेष भर दिला, ज्यामुळे विविध प्लॅटफॉर्म्सची कार्यक्षमता आणखी सुधारता येईल. FY26 मधील मजबूत आर्थिक कामगिरीनंतर कंपनीने 2030 पर्यंत आपल्या प्लॅटफॉर्म्सना अधिक सक्षम करण्यासाठी संशोधन व विकास (R&D) तसेच तांत्रिक बळकटीकरणावर अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भाविन पटेल म्हणाले, “FY26 हे व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचे वर्ष ठरले. आम्ही स्वतंत्र कर्ज व्यवसायांपलीकडे जाऊन एकात्मिक क्रेडिट पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म म्हणून आमची ओळख अधिक मजबूत केली आहे. महसूल आणि नफ्यात झालेली वाढ ही आमच्या कार्यक्षम संचालनाची, मजबूत संस्थात्मक भागीदारीची आणि अंडररायटिंग, तंत्रज्ञान तसेच जोखीम व्यवस्थापनातील सातत्यपूर्ण गुंतवणुकीची फलश्रुती आहे.

जबाबदार भांडवली सहभाग आवश्यक

भारतातील क्रेडिट क्षेत्राच्या पुढील टप्प्यातील वाढ केवळ वेगवान कर्जवितरणामुळे होणार नाही. त्यासाठी अधिक सक्षम क्रेडिट इंटेलिजन्स, पारदर्शक कार्यप्रणाली आणि जबाबदार भांडवली सहभाग आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट दीर्घकालीन दृष्टीकोन, नियामक अनुपालन आणि शाश्वत नफाक्षमता यांवर आधारित वित्तीय पायाभूत व्यवस्था उभारणे आहे. सुधारलेल्या नफा मार्जिनमुळे आम्हाला संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही आमची पायाभूत उत्पादने अधिक सक्षम आणि वेगाने विकसित करू शकू.” पुढील धोरणाचा भाग म्हणून, व्हर्टिस प्लॅटफॉर्म्स डिजिटल कर्जवितरण पायाभूत सुविधांमधील आपली उपस्थिती अधिक मजबूत करणार असून, तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या विकासाला गती देणार आहे. तसेच बँका, एनबीएफसी (NBFCs) आणि इतर वित्तीय संस्थांसोबतचे सहकार्य अधिक विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे. भारताच्या विकसित होत असलेल्या डिजिटल वित्तीय परिसंस्थेच्या गरजांनुसार अधिकाधिक लोकांना औपचारिक कर्ज (Formal Credit) उपलब्ध करून देणे हे समूहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

Web Title: Vertis platforms reports 96 crore pat in fy26 revenue up by 55 percent marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News
  • Marathi News
  • share market
  • share price

संबंधित बातम्या

ITR Rules: कमी इनकम असलेल्यांनाही बसणार दंड? वर्षाला 4 लाख कमाईवालेही ‘या’ लिस्टमध्ये, नेमका नियम काय?
1

ITR Rules: कमी इनकम असलेल्यांनाही बसणार दंड? वर्षाला 4 लाख कमाईवालेही ‘या’ लिस्टमध्ये, नेमका नियम काय?

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा
2

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा

LPG Price News: गॅस सिलिंडरवर 700 रुपयांपर्यंत सबसिडी? संसदेत सरकारचा मोठा खुलासा; पाहा  नेमके काय आहेत दर?
3

LPG Price News: गॅस सिलिंडरवर 700 रुपयांपर्यंत सबसिडी? संसदेत सरकारचा मोठा खुलासा; पाहा नेमके काय आहेत दर?

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त
4

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.