Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

Premayan Web Series: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे आता ‘प्रेमायण’ या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘बार्डो’सह विविध कलाकृतींमधून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मुडे यांनी या सिरीजची संकल्पना मांडली असून ते या वेबसिरीजचे क्रिएटर आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 15, 2026 | 05:50 PM
Premayan Web Series: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Premayan Web Series: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘प्रेमायण’ वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून STAGE OTT वर प्रदर्शित
  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे या वेबसिरीजचे क्रिएटर
  • आरा मल्टिमीडियाने या सिरीजची निर्मिती
‘बार्डो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासह ‘अंधार माया’, ‘रुद्रम’ ‘डावपेच’ आणि ‘कौल मनाचा’ ‘तारिणी’अशा विविध कलाकृतींमधून आपल्या वेगळ्या दिग्दर्शकीय शैलीचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे आता ‘प्रेमायण’ या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा गंध, मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावभावनांचे विविध पैलू आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडणारे भिमराव मुडे यावेळी प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाच्या संघर्षाने रंगलेले अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या स्टेज ओटीटी (STAGE OTT) या व्यासपीठावर ‘प्रेमायण’ ही वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून प्रदर्शित होणार आहे. Premayan Web Series:

वेबसिरीजचे ते क्रिएटर

‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या भिमराव मुडे यांच्या सर्जनशील प्रवासातील ‘प्रेमायण’ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या वेबसिरीजचे ते क्रिएटर असून, राजेश पाठक (कंटेंट हेड स्टेज मराठी)यांच्या कथेला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे यांच्या संकल्पनेची जोड लाभली आहे.

आरा मल्टिमीडिया निर्मित या वेब सिरीजचे दिग्दर्शन राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव, मानवी नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू यांची प्रभावी गुंफण करत ‘प्रेमायण’ मधून प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाचे अनोखे कथाविश्व उलगडणार आहे.

प्रेमाच्या वाटेवर उभे राहणारे

ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, जातीव्यवस्था,प्रेमातील गुंतागुंत, प्रतिष्ठेचा संघर्ष, सत्तेची समीकरणे आणि सूडाची धग यांचा थरारक संगम ‘प्रेमायण’मध्ये अनुभवायला मिळणार आहे. प्रेमाच्या वाटेवर उभे राहणारे सामाजिक अडथळे, प्रतिष्ठेसाठी सुरू असलेली धडपड आणि वैयक्तिक संघर्षांतून निर्माण होणारे नाट्य यांमुळे या सिरीजचे कथाविश्व अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

नात्यामागची एक वेगळी बाजू आणि प्रत्येक निर्णयामागची एक वेगळी कहाणी ‘प्रेमायण’मधून उलगडणार आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ गुंतवून ठेवणार नाही, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडेल, असा विश्वास भिमराव मुडे यांनी व्यक्त केला.

दमदार कलाकारांची फळी

‘प्रेमायण’ या सिरीजमध्ये हार्दिक जोशी, अभिनव कुरणे, प्रतीक्षा पोकळे, ओमप्रकाश शिंदे, उमेश जगताप, शुभांगी भुजबळ, पल्लवी ओंकार आणि विनोद लव्हेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले कथानक यांमुळे या सिरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या ‘बार्डो’ पासून ते ‘प्रेमायण’च्या नव्या डिजिटल प्रवासापर्यंत भिमराव मुडे यांची सर्जनशील वाटचाल सातत्याने नवनवीन विषयांना स्पर्श करणारी ठरली आहे. प्रेम, प्रतिष्ठा, सत्ता आणि सूड यांच्या संघर्षातून उलगडणारे ‘प्रेमायण’ चे कथाविश्व प्रेक्षकांना कितपत भावते आणि मराठी वेबविश्वात कोणती नवी छाप उमटवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Premayan marathi web series bhimrao mude stage ott release date rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Marathi web series

संबंधित बातम्या

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
1

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
3

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
4

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.