किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय माल्ल्याचे धक्कादायक खुलासे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
फरार दारूबाज अशी अनेक विशेषणं लावण्यात आलेल्या विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल एका पॉडकास्टमध्ये सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. याशिवाय त्याने चोरीचे आरोपही नाकारले आणि भारतापासून दूर राहण्याच्या आपल्या कारणांचे समर्थन केले.
विजय मल्ल्याने गुरुवारी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितले की, किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशाबद्दल मी सर्वांची माफी मागतो. या काळात मल्ल्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे नाकारले आहे आणि याबाबत आपल्याकडून संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. पुढे, पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्या म्हणाले की, निःष्पक्ष खटल्याची खात्री झाल्यास ते भारतात परतण्याचा विचार करू शकतात. मल्ल्या मार्च २०१६ मध्ये ब्रिटनला पळून गेल्याचे सांगण्यात येते. भारत ब्रिटनकडून मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करत आहे. नक्की काय म्हणाले विजय माल्ल्या जाणून घ्या (फोटो सौजन्य – Instagram)
तुम्ही मला पळपुटा म्हणू शकता..
चोरीच्या आरोपांवर विजय मल्ल्या म्हणाले की, तुम्ही मला फरार म्हणू शकता, पण मी पळून गेलेलो नाही. मी भारतातून पूर्वनियोजित सहलीवर आलो होतो. पण मी काही कारणास्तव परतलो नाही जे मला योग्य वाटते. म्हणून जर तुम्हाला मला फरार म्हणायचे असेल तर तुम्ही ते करू शकता, पण यात ‘चोरी’ कुठे आहे? असा सवालही त्यांनी या पॉडकास्टमध्ये केलाय.
न्यायालयीन आदेशाच्या अवमान प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, विजय माल्ल्या कोर्टापासून काढतोय पळ
9000 कोटींचे डोक्यावर कर्ज
खरं तर, माजी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यावर भारतीय बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. ते २०१६ पासून युकेमध्ये राहत असून प्रत्यार्पणाच्या कारवाईविरुद्ध लढत आहेत. २०१८ मध्ये मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या बाजूने युके न्यायालयाच्या निर्णयासह अनेक कायदेशीर अडचणी असूनही, ते अन्याय्य वागणूक आणि मीडिया ट्रायलचा हवाला देत भारतात परतण्यास विरोध करत आहेत. गेले अनेक वर्ष विजय मल्ल्याला भारताचे प्रयत्न चालू आहेत. मात्र आता आपल्या सर्व गोष्टींचे समर्थन त्यांनी या पॉडकास्टमधून केले आहे.
भारताने २०१७ मध्ये ब्रिटनकडून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. २०१८ मध्ये लंडन न्यायालयाने प्रत्यार्पणाला मान्यता दिली आणि २०१९ मध्ये ब्रिटनच्या गृहसचिवांनी त्याला मान्यता दिली. परंतु त्यानंतर विजय मल्ल्याने अपील केले आणि आता हा खटला कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे आणि अजूनही विजय माल्ल्या भारतात येण्यास तयार नाही.
आर्थिक मंदीची झळ
किंगफिशर एअरलाइन्स बुडण्यावर विजय माल्ल्याने उघडपणे भाष्य केले आणि माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यावर निशाणा साधला. मल्ल्या म्हणतात की जेव्हा कंपनी वाईट स्थितीत होती तेव्हा ते मुखर्जी यांच्याकडे गेले होते.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये विजय माल्ल्याने २००८ च्या आर्थिक मंदीबाबतही सांगितले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, ‘२००८ पर्यंत ते आमच्या बाजूने काम करत होते हे मी मान्य करतो. त्यानंतर काय झाले? एकदम सोपं आहे. तुम्ही कधी लेहमन ब्रदर्सबद्दल ऐकले आहे का? तुम्ही कधी जागतिक आर्थिक संकटाबद्दल ऐकले आहे का? त्याचा भारतावर परिणाम झाला नाही का? तो नक्कीच झाला.’ पुढे ते म्हणाले, ‘प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला. पैसा येणे थांबले. भारतीय रुपयालाही फटका बसला.’
माल्या, नीरव, चोक्सी स्वतःहून देशात परतणार; पळपुट्यांना कंगाल करण्याचा प्लान
प्रणव मुखर्जींबाबत काय म्हणाले
मल्ल्याने त्या काळाबद्दल सांगितले जेव्हा किंगफिशर एअरलाइन्स अडचणीत होती. ते म्हणाले, ‘मी प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो आणि सांगितले की एक समस्या आहे. किंगफिशर एअरलाइन्सला त्यांचे काम कमी करावे लागेल. विमानांची संख्या कमी करावी लागेल, कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागेल, कारण आपण अशा आर्थिक परिस्थितीत काम करू शकत नाही.’
पॉडकास्टमध्ये मल्ल्याने दावा केला की, ‘मला काम कमी करण्यास मनाई करण्यात आली होती. तुम्ही काम करत राहा, बँक तुम्हाला मदत करेल. या विश्वासावर काम करत राहिलो. किंगफिशर एअरलाइन्सला त्यांच्या सर्व उड्डाणे रद्द करावी लागली. किंगफिशर एअरलाइन्सला संघर्ष करावा लागला. ज्या वेळी तुम्ही कर्ज मागितले तेव्हा कंपनीची स्थिती चांगली नव्हती.’
विजय माल्ल्याचे पॉडकास्ट