Warner Brothers, the film company behind iconic films like Batman and Harry Potter (photo - social media )
Warner Bros Discovery : हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि जुन्या कंपन्यांपैकी असलेली वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी कर्जात बुडाल्याने विकण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे की त्यांना अनेक ऑफर मिळाल्या आहेत आणि त्या कंपन्या Warner Bros Discovery कंपनीच्या धोरणांचा आढावा घेतायत. या फिल्म स्टुडिओने हॅरी पॉटर, द डार्क नाईट ट्रायलॉजी, बॅटमॅन, द लॉर्ड ऑफ द रिंग्ज व डीसी युनिव्हर्स सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली.
जागतिक मीडियाच्या उद्योगात लक्षणीय बदल होत असताना Warner Brothers च्या विक्रीच्या चर्चा रंगल्या आहेत. स्ट्रीमिंगचे वर्चस्व, टेलिव्हिजनची घसरण आणि वाढत्या आर्थिक ताणामुळे वॉर्नर ब्रदर्स गंभीर टप्प्यावर असल्याचे म्हंटले जात आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीवर तब्बल $40 अब्ज किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या वाढत्या स्पर्धेत कर्ज फेडणे किंवा व्यवसायाला नव्याने सुलभ बनवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कंपनीने मांडले आहे. WBD चे सीईओ डेव्हिड झस्लाव यांनी “आपले भविष्य कुठे आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजेत.” असे म्हंटले आहे.
हेही वाचा : अमेरिकन फर्मचा खेळ! Vodafone Idea Jio ला देणार टक्कर! बुडत्या कंपनीला मिळाली ५३ हजार कोटींची ‘संजीवनी’
पारंपारिक टीव्ही नेटवर्क जसे, CNN, TNT आणि TBS यांना आधीसारखे उत्पन्न मिळत नाहीये. HBO Max व Discovery+ सारख्या स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या कंपन्या देखील Netflix आणि Disney+ सारख्या कंपन्यांच्या मागे आहेत. वाढत्या तंत्रज्ञानामुळे WB&W 2026 पर्यंत दोन स्वतंत्र कंपन्यांत विभागणी करण्याची योजना आखत आहेत. परिणामी, यामध्ये एक स्टुडिओ-स्ट्रीमिंग व्यवसायासाठी तर, दुसरी नेटवर्क-बातम्या विभागांसाठी राखण्यात येईल.
जगातील अनेक प्रमुख कंपन्यांनी वॉर्नर ब्रदर्स कंपनीमध्ये रस दाखवला असून Apple, Comcast (NBCUuniversal) आणि Netflix या सारख्या कंपन्या खरेदीदारांमध्ये अग्रेसर आहेत. काही अटी-शर्ती आणि अडथळ्यामुळे या कराराला मान्यता देता येत नाहीये. Warner Bros चे Apple साठी त्याचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मस Apple TV+ ला प्रगतीच्या शिखरावर जाण्यासाठी बळकटी देऊ शकतात. जर हा करार Comcast पूर्ण करत असेल तर प्रीमियम हॉलिवूड कंटेंट साठी Comcast एक विशाल फिल्म लायब्ररी बनवू शकते.
हेही वाचा : Bitcoin Return: ज्याला समजत होतो ‘घोटाळा’, त्यातूनच मिळाले 300% रिटर्न्स; बिटकॉईन आणि PayTM शेअरमधील अंतर
तसेच, Netflix सारख्या कंपनीसाठी हा करार कंटेंट मालकीच्या दिशेने मोठं पाऊल पाडण्यासाठी अत्यंत महत्वाचे असेल. त्यातच वॉर्नर ब्रदर्स पॅरामाउंट-स्कायडान्स सध्या डिस्कव्हरी खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर असून प्रति शेअर अंदाजे $22 ते $24 ची बोली कंपनीने केली आहे. बहुतेक ऑफर रोख स्वरूपाच्या आहेत. या करारात टेक आणि मीडिया दिग्गज कंपन्यासुद्धा रस दाखवत आहेत. WBD स्टुडिओ व स्ट्रीमिंग युनिट्ससाठी नेटफ्लिक्सच्या सल्लागाराने बँकेद्वारे बोली लावायला सुरुवात केली आहे. भांडवल खरेदी करण्यासाठी त्याही पेक्षा प्रमुख मालमत्ता खरेदी करण्यासाठी Apple आणि Comcast सारख्या कंपन्या विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या ऑफरला WBD ने मान्यता दिली नसून याबद्दल ते विचार करत असल्याची माहिती दिली आहे. पॅरामाउंट-स्कायडान्स त्याच्या संपर्कात असल्याचे म्हंटले जात आहे.






