2024 चे वर्ष संपायला आता काहीच दिवसांचा अवधी जरी शिल्लक राहिला असला तरी या वर्षाने नक्कीच अनेक आयपीओ पहिले आहे. काही आयपीओने तर गुंतवणूकदारांचे पैसे एका दिवसात डबल केले आहे. मागील आठवड्यात अनेक उत्तम आयपीओ आले, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. आता आपण पुढील आठवड्यातील येणाऱ्या आयपीओबद्दल जाणून घेऊया.
पुढील आठवड्यात आयपीओ करणार गुंतवणूकदारांना मालामाल (फोटो सौजन्य: iStock)
इंडो फार्म इक्विपमेंट ही शेतीची उपकरणे बनवणारी कंपनी 31 डिसेंबर रोजी त्यांचा मेनबोर्ड आयपीओ लाँच करणार आहे, ज्याचे उद्दिष्ट ₹260 कोटी उभारणे आहे. या इश्यूमध्ये ₹185 कोटींचा नवीन इश्यू आणि ₹75 कोटींचा ऑफर-फॉर-सेल समाविष्ट असेल. या ऑफरसाठी प्राइस बँड प्रति शेअर ₹204-215 असा निश्चित करण्यात आला आहे, ज्याची सबस्क्रिप्शन २ जानेवारी रोजी बंद होईल.
टेक्निकेम ऑरगॅनिक्स या लघु आणि मध्यम उद्योगाचा (SME) IPO ₹25.25 कोटींचा आहे आणि तो 31 डिसेंबर रोजी उघडेल. या इश्यूसाठी प्राइस बँड ₹52-55 प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. IPO 2 जानेवारी 2025 रोजी बंद होईल.
लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइसेस ट्रेडिंग कंपनी येत्या 1 जानेवारी रोजी त्यांचा ₹25.1 कोटी रुपयांचा आयपीओ लाँच करणार असून ३ जानेवारीला बंद होईल. बुक-बिल्ट इश्यूसाठी प्राईड बँड प्रति शेअर ₹51-52 असा निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ सार्वजनिक ऑफरिंगसाठी नवीन वर्षाची सुरुवात करेल.
फॅबटेक टेक्नॉलॉजीज क्लीनरूम्स ही औषध कंपनी ३ जानेवारी रोजी आयपीओमध्ये 32.64 लाख शेअर्स ऑफर करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. इश्यूसाठी प्राइस बँड अद्याप जाहीर झालेला नाही. आयपीओ 7 जानेवारी 2025 रोजी बंद होईल.
हे सर्व आयपीओ लवकरच खुले होणार असून यामध्ये पैश्यांची गुंतवणूक करताना नीट विचार करा. तसेच आर्थिक तज्ञांचे मत विचारात घ्या.