
MPSC News: कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 827 उमेदवार मुलाखातीस पात्र, तर...
कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र
५२० उमेदवार पुण्यातील
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला हा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस (Career )पात्र ठरले असून त्यापैकी ५२० उमेदवार पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाने प्रशासकीय कारणास्तव तीन उमेदवारांचा निकाल तात्पुरता राखून ठेवला आहे.
कृषी सेवा संवर्गाची पदे या भरतीतून वगळल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. आंदोलनानंतर आयोगाने विषयाची दखल घेत २६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सेवा संवर्गातील २५८ पदांचा समावेश भरतीत करण्यात आला. त्यानंतर पुढील प्रक्रिया १ डिसेंबर २०२४ – संयुक्त पूर्वपरीक्षा आयोजित, १८ मे २०२५ – कृषी सेवा मुख्य परीक्षा घेतली.
दरम्यान, राज्यसेवा वन सेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांचे निकाल व तात्पुरत्या निवड याद्या जाहीर होऊनही कृषी सेवेचा निकाल न लागल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व अस्वस्थता वाढली होती. कृषी सेवा भरतीतील अंतिम निर्णय आणि मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आता सर्व उमेदवारांना लागली आहे. उमेदवारांच्या दृष्टीने ही भरती पुढील काही दिवसांत निर्णायक टप्प्यात जाईल. एमपीएससीने जाहीर केले आहे की, पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्रांची पडताळणी या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावले जाईल.
नीट, जेईई परीक्षांसाठी फेस रिकग्निशन! इतर परीक्षांमध्येही ‘ही’ व्यवस्था जाणार राबवली
एकूण आकडेवारी
घटक- संख्या
मुलाखतीस पात्र उमेदवार- ८२७
पुण्यातील पात्र उमेदवार- ५२०
निकाल राखून ठेवलेले- ३
समाविष्ट केलेली पदे- २५८
पूर्वपरीक्षा तारीख १ डिसेंबर २०२४
मुख्य परीक्षा तारीख१८ मे २०२५
इतर परीक्षांमध्येही जाणार राबवली ‘ही’ व्यवस्था
नीट, जेईई यांसारख्या देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ पासून नीट, जेईई तसेच इतर प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी फेस रिकग्निशन (चेहरा ओळख) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून फसवणूक, बनावट उमेदवार आणि पेपरफुटीचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या नियमांनुसार उमेदवारांना अर्ज प्रक्रियेदरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. हा फोटो प्रत्यक्ष वेळेत (Live Capture) घेतला जाणार असल्याने, अर्ज भरणारी व्यक्ती खरीच उमेदवार आहे की नाही, याची तात्काळ खातरजमा करता येणार आहे.