
आता कृषी शिक्षणही महागले; यंदापासून शैक्षणिक शुल्कात होणार तब्बल 54 टक्के वाढ
मुंबई : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क वाढण्याची शक्यता आहे. शासनाने नव्या शुल्क रचनेला मान्यता दिल्यास कृषी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल ५४ टक्के वाढ होणार आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर होताच त्याची अंमलबजावणी २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तत्काळ करण्याच्या तयारीत विद्यापीठे आहेत.
कृषी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क २०१३ पासून वाढविण्यात आलेले नाही. मात्र, शैक्षणिक सुविधा खर्चात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शुल्कवाढ क्रमप्राप्त ठरते. नवी शुल्क रचना स्वीकारल्यास महसूल वाढेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सेवा-सुविधांमधील आर्थिक अडचणी दूर होतील, असे विद्यापीठांचे म्हणणे आहे. सर्वच कृषी विद्यापीठांच्या विद्या परिषदा तसेच कार्यकारी परिषदांनी शुल्क वाढीच्या कृषी विद्यापीठांकडून शुल्क वसुली दोन सत्रांत केली जाते.
कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला पहिल्या सत्रासाठी सर्वसाधारणपणे २७ हजार ४५० रुपये, तर दुसऱ्या सत्रात १५ हजार २०० रुपये असे एकूण ४२ हजार ६५० रुपये मोजावे लागतात. मात्र, शुल्कवाढीनंतर विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या सत्रासाठी अनुक्रमे ३६ हजार ४१० रुपये व २९ हजार ४०० रुपये शुल्क द्यावे लागेल. नव्या शुल्क रचनेत दोन्ही सत्रे मिळून एकूण ६५ हजार ८१० रुपये शुल्क असेल.
पदवीसाठी मोजावे लागेल ६५ हजार ८१० रुपये शुल्क
महात्मा फुले कृषि विद्यापीठ शिफारशी केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने देखील शिफारशींवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यात आला आहे.